Join us

आणखी एक सेल्फिश शतक, ‘विराट’ विक्रमानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधारानं उडवली हाफिझची खिल्ली 

ICC CWC 2023: विराट कोहलीच्या या विक्रमी खेळीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिझची खिल्ली उडवली आहे. आणखी एक सेल्फिश शतक, असं लिहत वॉनने मोहम्मद हाफिझला टॅग केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 12:09 IST

Open in App

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त शतकी खेळी केली. यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील विराट कोहलीची ही एकदिवसीय क्रिकेटमधील ही ५० वी शतकी खेळी ठरली. त्याबरोबरच विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक ४९ शतकांचा विक्रम मोडीत काढला. दरम्यान, विराट कोहलीच्या या विक्रमी खेळीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिझची खिल्ली उडवली आहे. आणखी एक सेल्फिश शतक, असं लिहत वॉनने मोहम्मद हाफिझला टॅग केले.

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संयमी शतकी खेळी करत सचिन तेंडुलकरच्या ४९ एकदिवसीय शतकांशी बरोबरी केली होती. त्यानंतर जगभरातून विराट कोहलीचं कौतुक झालं होतं. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिझने विराटच्या या खेळीवर टीका केली होती. भारताच्या डावाच्या शेवटच्या क्षणी विराटने चौकार न मारता एकेरी धावा घेत धावसंख्या पुढे नेली. ही बाब संघाच्या हिताऐवजी त्याच्या स्वार्थी स्वभावाला चित्रित करते, असे हाफिझ म्हणाला होता.

त्यावरूनच आज मायाकेल वॉनने मोहम्मद हफिझची खिल्ली उडवली. ‘आणखी एक सेल्फिश १००’, असं लिहीत वॉनने वॉनने मोहम्मद हाफिझला टॅग केलं. मात्र आज ऐतिहासिक ५० वं शतकं पूर्ण केल्यानंतर मोहम्मद हाफिझनं विराट कोहलीचं कौतुक केलं. विश्वविक्रमी ५० व्या एकदिवसीय शतकासाठी विराट तुझं अभिनंदन. जगभरातील क्रिकेटप्रेमींचं मनोरंजन करत राहा, असे मोहम्मद हाफिझने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :विराट कोहलीवन डे वर्ल्ड कपभारतीय क्रिकेट संघ