Join us  

बंदीनंतर मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉची पुन्हा एकदा बॅट तळपली

बंदीची शिक्षा पूर्ण केल्यावर मैदानात उतरलेल्या पृथ्वीची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 12:39 PM

Open in App

मुंबई : बीसीसीआयने बंदी घातलेला पृथ्वी शॉ हा मैदानात परतल्यावर कुणाचेही ऐकत नसल्याचेच समोर आले आहे. कारण बंदीची शिक्षा पूर्ण केल्यावर मैदानात उतरलेल्या पृथ्वीची बॅट चांगलीच तळपलेली पाहायला मिळत आहेत.

पृथ्वी शॉचे धमाकेदार पुनरागमन; साकारली तुफानी खेळी" src="https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/shea_201911325900.jpg"/>

उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली. पण ही बंदी उठल्यावर पृथ्वीने मैदानामध्ये धावांचा रती घालायला सुरुवात केली आहे. यापूर्वी झालेल्या आसामविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात पृथ्वीने अर्धशतक झळकावले होते. आता दुसऱ्या सामन्यातही पृथ्वीने धडाकेबाज फलंदाजी कायम ठेवली आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत पृथ्वीने झारखंडविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. पृथ्वीने ३९ चेंडूंत ४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ६४ धावांची झंझावाती खेळी साकारली. झारखंडने प्रथम फलंदाजी करत मुंबईपुढे १७१ धावांचे आव्हान ठेवले होते. पृथ्वीच्या या खेळीच्या जोरावर मुंबईने झारखंडवर सहज विजय मिळवला,

भारताचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर काही दिवसांपूर्वी उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी बंदी घालण्यात आली. पण ही बंदी उठल्यावर पृथ्वी आज मैदानात उतरला आणि त्याने तुफानी खेळी साकारत दमदार पुनरागमन केले.

उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी पृथ्वीवर आठ महिन्यांची बंदी घालण्याता निर्णय बीसीसीआयने घेतला होता. आज पृथ्वीवरील बंदी उठली आणि त्याने दिमाखात पुनरागमन केले आहे.

बीसीसीआयच्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत पृथ्वीने धडाकेबाज फलंदाजी करत आपले पुनरागमन साजरे केले. मुंबईचा आज आसामविरुद्ध सामना होता. या सामन्यात पृथ्वीने ३९ चेंडूंमध्ये ६३ धावांची जबरदस्त खेळी साकारली. या खेळीमध्ये त्याने सात चौकार आणि दोन षटकारांची बरसात केली. पृथ्वीच्या दमदा फलंदाजीच्या जोरावर मुंबईला २०५ धावांचा डोंगर उभारता आला. मुंबईच्या या आव्हानाचा पाठलाग करताना आसामला १२३ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने हा सामना ८३ धावांनी जिंकला. 

टॅग्स :पृथ्वी शॉमुंबईझारखंड