Join us  

अजित आगरकर न्याय देणार! रिंकू, ऋतुराज, जितेश भारताच्या T20I संघात दिसणार, जाणून घ्या कसं

निवड समितीचा नवनिर्वाचित प्रमुख अजित आगरकरने ( Ajit Agarkar) त्याच्या पहिल्याच बैठकीत वेस्ट इंडिज दौऱ्याकरिता भारताच्या ट्वेंटी-२० संघाची घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 12:24 PM

Open in App

निवड समितीचा नवनिर्वाचित प्रमुख अजित आगरकरने ( Ajit Agarkar) त्याच्या पहिल्याच बैठकीत वेस्ट इंडिज दौऱ्याकरिता भारताच्या ट्वेंटी-२० संघाची घोषणा केली. रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आदी सीनियर मंडळी या ट्वेंटी-२० संघात दिसली नाहीत. यशस्वी जैस्वाल व तिलक वर्मा हे युवा चेहरे हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली ही मालिका गाजवण्यासाठी निवडले गेले आहेत. त्याचवेळी रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड व जितेश शर्मा या आयपीएल २०२३ गाजवणाऱ्या खेळाडूंना संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पण, अजित सर्वांना न्याय देणार आहे.

भारतीय संघ आशियाई स्पर्धेत सहभाग घेणार आहे आणि चीनमध्ये होणाऱ्या Asian Games साठी लवकरच संघ जाहीर केला जाणार आहे. BCCI ने आशियाई स्पर्धेकरीता भारताचा पुरुष व महिला संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जुलैपर्यंत आशियाई ऑलिम्पिक परिषदेकडे खेळाडूंच्या नावाची यादी पाठवायची आहे आणि त्यासाठी आता लवकरच भारताच्या पुरूष व महिला संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. ज्या खेळाडूंना वेस्ट इंडिज दौऱ्यावरील ट्वेंटी-२० संघात स्थान नाही मिळाले त्यांना आशियाई स्पर्धेसाठी निवडले जाणार आहे. रिंकू सिंग, ऋतुराज गायकवाड आणि जितेश शर्मा यांची निवड होण्याची शक्यता आहे. आशियाई स्पर्धेसाठी बीसीसीआय दुसऱ्या फळीतील खेळाडू निवडणार आहेत, कारण त्याच दरम्यान भारतात वन डे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.

शिखर धवन आशियाई स्पर्धेसाठीच्या संघाचे नेतृत्व करण्याचा अंदाज आहे. गायकवाड, जितेश आणि रिंकूसह उम्रान मलिका, अर्शदीप सिंग, राहुल चहर आणि तिलक वर्मा यांनाही संधी मिळू शकते.  इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रिंकूने १४ सामन्यांत ४७४ धावा चोपून सर्वांना इम्प्रेस केलं होतं. एकहाती सामना फिरवण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. ऋतुराज वेस्ट इंडिज दौऱ्यावरील वन डे व कसोटी संघाचा सदस्य असलेल्या ऋतुराज गायकवाडला मात्र ट्वेंटी-२० संघातून वगळण्यात आले. आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या या सलामीवीराने १६ सामन्यांत ५९० धावा चोपल्या होत्या.  जितेशनेही ३०९ धावा केल्या आहेत.  

  

टॅग्स :अजित आगरकरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआशियाई क्रीडा स्पर्धा
Open in App