Join us  

दुस-या कसोटीतही भारताचा धावांचा डोंगर, 622 धावांवर डाव केला घोषित

पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुस-या कसोटीतही भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 11:48 AM

Open in App
ठळक मुद्देकालच्या धावसंख्येत आणखी 6 धावांची भर घातल्यानंतर 350 धावांवर चेतेश्वर पूजाराच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 217 धावांची भागीदारी केली. 

कोलंबो, दि. 4 - पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुस-या कसोटीतही भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला आहे. टीम इंडियाने 9 बाद 622 धावांवर डाव घोषित केला आहे. दुस-या दिवशीही भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांना अजिबात दाद दिली नाही. 

शतकवीर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पूजारा लवकर माघारी परतल्यानंतर वृद्धीमान सहा, अश्विन आणि रविंद्र जाडेजा यांनी अर्धशतके फटकावली. त्यामुळे भारताला 600 धावांचा टप्पा ओलांडता आला. या तिघांनी उपयुक्त भागीदा-या रचल्या. सहा (67), अश्विनने (54) धावा केल्या.  जाडेजाने नाबाद (70) धावा केल्या.  खेळाला सुरुवात झाल्यानंतर कालच्या धावसंख्येत आणखी 6 धावांची भर घातल्यानंतर 350 धावांवर चेतेश्वर पूजाराच्या रुपाने भारताला चौथा धक्का बसला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 217 धावांची भागीदारी केली. 

(133) धावांवर पूजाराला करुणारत्नेने  पायचीत केले. त्यानंतर रहाणे बाद झाला. (132) धावांवर रहाणेला पुष्पकुमाराने डिकवेलाकरवी झेलबाद केले. आता अश्विन आणि वृद्धीमान सहाची जोडी मैदानावर आहे. गेल्या लढतीत शतकी खेळी करणारा पुजारा ५० वा कसोटी सामना खेळत आहे. त्याची कालच प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. सौराष्ट्रच्या या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये कारकीर्दीतील १३ वे शतक झळकावले.मालिकेत सलग दुस-यांदा शतक झळकावणाºया पुजाराने चार हजार धावांचा पल्ला गाठला. 

यापूर्वीच्या कसोटी डावांमध्ये त्याने १७, ९२, २०२, ५७ व १५३ धावांच्या खेळी केल्या आहेत. पुजारा सचिननंतर श्रीलंकेविरुद्ध सलग तीन शतके ठोकणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला. गेल्या मोसमातील निराशाजनक कामगिरीनंतर सूर गवसलेल्या रहाणेने नववे कसोटी शतक पूर्ण केले. पुनरागमन करणारा लोकेश राहुल (५७ धावा) आणि विराट कोहली (१३ धावा) उपाहारानंतर बाद झाल्यावर पुजारा व रहाणे यांनी नाबाद द्विशतकी भागीदारी केली.