Join us  

शाहिद आफ्रिदीच्या काश्मीरबाबतच्या वादग्रस्त विधानावर भारतीय चाहत्यांमध्ये संभ्रम

आफ्रिदीने यावेळी काश्मीर प्रश्नावर आपले मत व्यक्त केले आहे. त्याने व्यक्त केलेले मत हे माणूसकीला धरून आहे, असे काही जण म्हणत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 4:52 PM

Open in App
ठळक मुद्देपाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी त्याने भारताविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते आणि तो अचडणीत आला होता.आता पुन्हा एकदा त्याने वादग्रस्त विधान केले असून भारतीय चाहत्यांमध्ये याबाबत कुजबूज सुरु आहे.

कराची : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी हा वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी त्याने भारताविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते आणि तो अचडणीत आला होता. आता पुन्हा एकदा त्याने वादग्रस्त विधान केले असून भारतीय चाहत्यांमध्ये याबाबत कुजबूज सुरु आहे.

आफ्रिदीने यावेळी काश्मीर प्रश्नावर आपले मत व्यक्त केले आहे. त्याने व्यक्त केलेले मत हे माणूसकीला धरून आहे, असे काही जण म्हणत आहे. त्यामुळे काही जण आफ्रिदीच्या बाजूनेही आहेत. पण काही लोकांनी आफ्रिदीला चांगलेच धारेवर धरले आहे.

 

हा पाहा आफ्रिदीचा व्हीडीओ

आफ्रिदी नेमके काय बोललाआम्हाला आमचा देश सांभाळता येत नाही, तर आम्ही काश्मीर काय सांभाळणार? काश्मीरमध्ये होणाऱ्या सामन्य माणसांच्या हत्या वेदनादायी आहेत. माझ्यामते माणूसकी सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे काश्मीर हा पाकिस्तानकडे नसावा, तसेच भारताकडेही नसावा. काश्मीर हा स्वतंत्र असावा, असे मत आफ्रिदीने व्यक्त केले आहे.

टॅग्स :शाहिद अफ्रिदीभारतपाकिस्तानजम्मू-काश्मीर