म्हापसा: इंग्लडातील काउंटीत पंचगिरी केल्यानंतर खोर्ली-म्हापसा येथील यशवंत बर्डे याला दक्षिण आफ्रिकेतील प्रथम श्रेणी स्तरावरील सामन्यात पंचगिरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. भारतीय नियामक मंडळाने दक्षिण आफ्रिकेत जाण्यासाठी त्यांची निवड केली असून निवडलेला बर्डे हे एकमेव गोवेकर पंच ठरले आहेत.
बर्डे पुढील आठवड्यात ११ जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार असून तत्पुर्वी मुंबई तसेच छत्तीसगड दरम्यान ७ जानेवारी पासून होणाऱ्या रणजी सामन्यात ते पंचगिरी करुन नंतर मुंबईहून थेट दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत. मध्य प्रदेश तसेच हिमाचल प्रदेश यांच्यातील सामन्यात पंचगिरी करताना त्यांना आफ्रिकेतील दौºया संबंधीची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली. काउंटी प्रमाणे आफ्रिकेत सुद्धा बर्डे तीन सामन्यात पंचगिरी करणार आहेत. त्यानंतर ते भारतात परतणार आहेत. पंच या नात्याने देशातील विविध स्पर्धात प्रभावी कामगिरी केल्यानंतर त्याला इंग्लडात जाण्याची संधी प्राप्त झाली होती. आयपीएल, दुपील चषक, देवधर चषक, रणजी चषक सारख्या देशांतर्गत स्पर्धातून त्यांना पंचगिरी करण्याचा चांगला अनुभव आहे. देशातील अशा स्पर्धात सरस कामगिरी करणाºया पंचाची स्पर्धेतील पंचगिरीच्या निकषावर निवडले जाते. त्यामुळे प्रभावी कामगिरीच्या जोरावर त्यांना पुन्हा निवडण्यात आले आहे.
भारत, आफ्रिका तसेच आॅस्ट्रोलिया या तीन आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाºया देशातील क्रिकेट मंडळात झालेल्या देवाण घेवाण करारा अंतर्गत ही निवड करण्यात आलेली. या देशातील पंचाना दुसºया देशात जाऊन पंचगिरी करण्याचा अनुभव प्राप्त होणे हा या मागचा मूळ उद्देश आहे. त्यात दोन देशात जावून पंचगिरी केल्यानंतर आॅस्ट्रेलिया दौºयात जावून तेथे पंचगिरी करणे तसेच त्यानंतर तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा पंच होण्याच्या दिशेने बर्डेची वाटचाल सुरु झाली आहे. रणजीसह देशातील विविध स्पर्धात गोव्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा मानही त्यांना मिळाला आहे. त्यातून गोव्याचे प्रतिनिधीत्व करताना एक चांगला आॅलराऊंडर म्हणून बºयाच सामन्यात चांगल्या खेळाचे सुद्धा प्रदर्शन केले होते. क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी या खेळाकडे असलेले आपले नाते कायम ठेवताना पंचगिरी करण्यास सुरुवात केली होती. इंग्लडमधील काऊंटी स्पर्धेत विविध देशातील क्रिकेटपटू भाग घेत असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जांच्या क्रिकेटपटूंचा समावेश असलेल्या काऊंटी स्पर्धेत पंचगिरी करण्यासाठी लाभलेल्या संधीतून चांगला अनुभव प्राप्त झाला होता.
इंग्लड तसेच आफ्रिकेतील वातावरण वेगळे असले तरी तेथील खेळपट्ट्या जलदगतीच्या गोलंदाजांसाठी पोषक अशा असतात. त्यात इंग्लडाच्या तुलनेत आफ्रिकेतील खेळपट्ट्या जास्त उसळी घेणाºया असतात अशी प्रतिक्रिया बर्डे यांनी आपल्या निवडीवर आनंद व्यक्त करताना दिली. या निवडीतून आफ्रिकेत जाण्याची संधी लाभल्याने बर्डे यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅनलात निवड होण्यासाठीचा दावा आणखीन मजबूत होवू शकतो. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी करणे हे आपले स्वप्न असून तेच स्वप्न यशवंत बर्डे यांनी आपल्या उराशी बाळगले आहे.
Web Title: After County cricket Yashwant Barde is also a chance for the umpire in Africa
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.