Good News : ट्वेंटी-20 लीगचे वेळापत्रक जाहीर; स्मिथ, वॉर्नरच्या फटकेबाजीचा रंगणार थरार 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) घोषणेची उत्सुकता लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 10:25 AM2020-07-15T10:25:38+5:302020-07-15T10:26:24+5:30

whatsapp join usJoin us
After CPL T20, BBL 10 schedule also announced; season to begin on December 03 | Good News : ट्वेंटी-20 लीगचे वेळापत्रक जाहीर; स्मिथ, वॉर्नरच्या फटकेबाजीचा रंगणार थरार 

Good News : ट्वेंटी-20 लीगचे वेळापत्रक जाहीर; स्मिथ, वॉर्नरच्या फटकेबाजीचा रंगणार थरार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या संकटात आता हळुहळु क्रिकेटला सुरुवात झाली आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर पुढील महिन्यात कॅरेबियन प्रीमिअर लीग ( सीपीएल) खेळवण्यात येणार आहे आणि आता आणखी एका लीगच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. बिग बॅश लीगच्या 10व्या मोसमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून आता सर्वांना इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) घोषणेची उत्सुकता लागली आहे. ( BBL 10 schedule also announced)

या लीगसाठी येणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या क्वारंटाईन प्रक्रिया आणि सुरक्षितता लक्षात घेता यंदाच्या लीगचा कालावधी वाढला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं बुधवारी हे वेळापत्रक जाहीर केले. गतवर्षीच्या मोसमाच्या दोन आठवडे आधी ही लीग सुरू होणार आहे. ही लीगच्या वेळापत्रकादरम्यान ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातल्या मालिकेतील सामनेही होणार आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि पॅट कमिन्स यांना संपूर्ण लीगमध्ये सहभाग घेता येणार नाही. (BBL 10 schedule also announced)

3 डिसेंबरपासून ही लीग सुरू होणार असून मेलबर्न स्ट्रायकर आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यास सलामीचा सामना होणार आहे. बिग बॅश लीगचे प्रमुख अॅलिस्टेर डॉब्सन यांनी सांगितले की,''हे लीगचे दहावे सत्र आहे आणि क्लब, पार्टनर यांनी ही लीग खेळवण्यासाठी सर्व तयारी केली आहे.''(BBL 10 schedule also announced)


Web Title: After CPL T20, BBL 10 schedule also announced; season to begin on December 03

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.