Join us  

विराट-अनुष्काच्या मुलीला अत्याचाराची धमकी: महिला आयोग अ‍ॅक्शनमध्ये, पोलिसांना केला थेट सवाल

खरे तर, ट्रोलर्सना विराटची नाराजी न आवडल्याने, त्यांनी त्याच्या मुलीसंदर्भात शिवीगाळ आणि असंवेदनशील भाष्य करायला सुरूवात केली. एवढेच नाही, तर या ट्रोलर्सनी अत्याचाराची धमकीही दिली. अत्याचाराशी संबंधित ही पोस्ट आंद्रे बोर्गेस यांनी शेअर केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 3:06 PM

Open in App

टीम इंडियाचा टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात पराभव झाला. यानंतर सोशल मिडिया युझर्सनी गोलंदाज मोहम्मद शमीला निशाण्यावर घेतले होते. काही युझर्सनी शमिच्या धर्मावर बोट ठेवत त्याला गद्दारही म्हटले होते. यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ट्रोलर्सवर जबरदस्त भडकला होता आणि ज्यांनी असे कृत्य केले, ते पाठीचा कणा नसलेले लोक आहेत, असे विराटने म्हटले होते. (Virat -Anushka daughter vamika gets rape threats)

खरे तर, ट्रोलर्सना विराटची नाराजी न आवडल्याने, त्यांनी त्याच्या मुलीसंदर्भात शिवीगाळ आणि असंवेदनशील भाष्य करायला सुरूवात केली. एवढेच नाही, तर या ट्रोलर्सनी तिच्यावर अत्याचार करण्याची धमकीही दिली. अत्याचाराशी संबंधित ही पोस्ट आंद्रे बोर्गेस यांनी शेअर केली आहे. यानंतर, आता दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

महिला आयोगाकडून गंभीर दखल -आता याप्रकरणी दिल्‍ली महिला आयोगाच्या प्रमुख स्‍वाती मालीवाल यांनी मोठे वक्तव्य केले आहे. की त्यांच्या पाहण्यात काही असे ट्विट आले आहेत, ज्यांत विराटच्या 9 महिन्यांच्या मुलिवर बलात्‍काराची धमी देण्यात आली आहे. यानंतर मालीवाल यांनी दिल्‍ली पोलीसच्या सायबर क्राइम ब्रांचला पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.

मालीवाल यांनी, दिल्ली पोलिसांकडे याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या FIR संदर्भात माहिती मागितली आहे. याप्रकरणी कोण-कोणत्या आरोपींची ओळख पटली आणि कुणा-कुणाला अटक करण्यात आली? याची माहिती आयोगाला हवी आहे. एवढेच नाही, तर कुणालाही अटक करण्यात आलेली नसेल, तर दिल्‍ली पोलिसांनी आरोपींना अटक करण्याच्या दृष्टीने कोणकोणती पावले उचलली, यासंदर्भात माहिती द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माबॉलिवूडसोशल मीडिया
Open in App