PAK vs AFG: पराभव होताच अफगाणिस्तानचे चाहते संतापले; खुर्च्यांची केली तोडफोड, शोएब अख्तरने विचारला जाब

अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तानी चाहत्यांना मारहाण केल्यामुळे शोएब अख्तर संतापला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 12:34 PM2022-09-08T12:34:14+5:302022-09-08T12:36:29+5:30

whatsapp join usJoin us
After defeat against Pakistan, Afghanistan fans got angry, Pakistani fans were beaten, Shoaib Akhtar angry | PAK vs AFG: पराभव होताच अफगाणिस्तानचे चाहते संतापले; खुर्च्यांची केली तोडफोड, शोएब अख्तरने विचारला जाब

PAK vs AFG: पराभव होताच अफगाणिस्तानचे चाहते संतापले; खुर्च्यांची केली तोडफोड, शोएब अख्तरने विचारला जाब

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला असून ही स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका या 4 संघांनी सुपर-4 मध्ये प्रवेश मिळवला आहे. मात्र अफगाणिस्तान आणि भारत या संघांना सुपर-4 च्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाला पहिल्या सुपर-4 सामन्यात पाकिस्तानने तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने पराभूत केले. बुधवारी झालेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानने 1 बळी राखून निसटता विजय मिळवला. लक्षणीय बाब म्हणजे सुपर-4 मध्ये पराभूत झालेल्या संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

अफगाणिस्तानविरूद्ध पाकिस्तानच्या संघाने निसटता विजय मिळवल्याने अफगाणिस्तानचे चाहते चांगलेच संतापले आहेत. सामना पार पडताच अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये चांगलाच राडा केला. तसेच पाकिस्तानी चाहत्यांना देखील मारहाण केली. यावरून पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला जाब विचारला आहे. अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी यापूर्वी देखील अशाच प्रकारचा राडा केला असल्याचे म्हणत अख्तरने या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. 

शोएब अख्तरने विचारला जाब 
शोएब अख्तरने ट्विट करत म्हटले, "अफगाणिस्तानचे चाहते हे काय करत आहेत. त्यांनी मागील अनेक वेळा हेच केले आहे. हा एक खेळ आहे आणि तो योग्य भावनेने खेळला जावा आणि घेतला जावा. @ShafiqStanikzai जर तुम्हाला  खेळात प्रगती करायची असेल तर तुमची गर्दी आणि तुमचे खेळाडू या दोघांना काही गोष्टी शिकण्याची गरज आहे." अशा शब्दांत अख्तरने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डावर प्रश्न उपस्थित केले. 


 
पाकिस्तानच्या विजयाची हॅट्रिक
पाकिस्तानने अफगाणिस्तानला पराभूत करून सुपर-4 मध्ये आपला दुसरा विजय मिळवला आहे. हॉंगकॉंगला मोठ्या अंतराने पराभूत करून पाकिस्तानने सुपर-4 मध्ये जागा मिळवली होती. बुधवारच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानच्या आक्रमक गोलंदाजीचा सामना करू शकला नाही. अखेर 20 षटकांमध्ये 6 बाद 129 एवढी धावसंख्या करून अफगाणिस्तानने 130 धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाची सुरूवात शानदार झाली होती. मात्र अखेरच्या काही षटकांमध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करून पाकिस्तानला घाम फोडला. मात्र अखेरच्या षटकात पाकिस्तानने निसटता विजय मिळवून विजयाची हॅट्रिक लगावली. पाकिस्तानने 19.2 षटकात 9 बाद 131 धावा करून सामना आपल्या नावावर केला. 

 

Web Title: After defeat against Pakistan, Afghanistan fans got angry, Pakistani fans were beaten, Shoaib Akhtar angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.