मधल्या फळीतील फलंदाज विजय शंकरच्या नाबाद ५१ धावांमुळे (२४ चेंडू, २ चौकार, ५ षटकार) सध्याचा विजेता गुजरात टायटन्सने शनिवारी विजयी हॅट्रिक साधताना कोलकाता नाइट रायडर्सला ईडनवर सात गड्यांनी पराभूत केले. विजयामुळे १२ गुणांसह गुजरात अव्वल स्थानावर विराजमान झाला. केकेआरला २० षटकांत ७ बाद १७९ धावांत रोखल्यानंतर गुजरातने १७.५ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या.
कोलकाताला पराभूत करत आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातने पहिल्या स्थानी झेप घेतली. तर राजस्थानची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. लखनौ १० गुणांसह तिसऱ्या स्थानी असून चेन्नई चौथ्या क्रमांकावर आहे. बंगळुरु पाचव्या क्रमांकावर असून पंजाब सहाव्या क्रमांकावर आहे. कोलकाता सातव्या, तर हैदराबाद आठव्या क्रमांकावर आहे. मुंबई नवव्या स्थानी असून दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहे.
हैदराबादने मुंबईला टाकलं मागे
सहाव्या क्रमांकावर पंजाब किंग्स संघ आहे. आठ सामन्यांपैकी चार सामने जिंकल्यानंतर पंजाबकडे ८ गुण आहेत. कोलकाता सातव्या तर हैदराबाद आठव्या क्रमांकावर आहे. कोलकाता आणि हैदराबादकडे प्रत्येकी ६-६ गुणज आहेत. कोलकाता संघाने नऊ सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यातील विजयासह सनराजर्स हैदराबादने मुंबई धक्का दिला आहे. मुंबई एक स्थान खाली घसरला आहे. मुंबईने सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकले तर, चार सामने गमावले आहे. हैदराबादकडून पराभवानंतर दिल्ली गुणतालिकेत सर्वात खाली दहाव्या क्रमांकावर आहे.