Join us  

"मला किंवा कोणाला कधीच सॉरी म्हणू नको...", कोच पॉंटिंगनं कुलदीपसह इतरांचं वाढवलं मनोबल

ricky ponting ipl : आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 5:04 PM

Open in App

delhi capitals team | नवी दिल्ली : आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (DC vs RCB) दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव केला. खरं तर डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वातील दिल्लीचा या स्पर्धेत सलग पाचवा पराभव झाला आहे. २०२० मध्ये आयपीएलचा फायनलचा सामना खेळणारा दिल्लीचा संघ सध्या विजयाच्या शोधात आहे. संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर सातत्याने धावा करत असला तरी त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली होती. पण फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे संघाला सलग पाचव्यांदा पराभव स्वीकारावा लागला. सततच्या पराभवानंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंगने ड्रेसिंगरूममध्ये खेळाडूंचे मनोबल वाढवले आणि काही खेळाडूंचे कौतुक केले. यावेळी सौरव गांगुली देखील उपस्थित होते.

पॉंटिंगने शिलेदारांचे मनोबल वाढवले खेळाडूंचे मनोबल वाढवताना पॉंटिंगने म्हटले, "होय, आपण खरंच चांगली गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघाने आपल्याला आव्हान देताना पॉवरप्लेमध्ये वेगाने धावा केल्या. तरीदेखील आपण सामन्यात पुनरागमन केले. कुलदीप, कुठे आहेस मित्रा? सामना झाल्यानंतर तू मला सॉरी म्हणालास. तेव्हा मित्रा, क्रिकेटच्या मैदानावर जे काही घडते त्यासाठी मला किंवा कुणालाही कधीही सॉरी बोलू नका. तुम्ही मजबुतीने पुनरागमन करावे अशी माझी इच्छा आहे." 

तसेच ललित यादवने देखील गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. त्या षटकात २ षटकार बसले नाहीतर आम्ही ज्यासाठी तुला चेंडू दिला होता ते तू करून दाखवले होतेस. अक्षरने देखील चमकदार कामगिरी केली. त्याने ३ षटकांत २५ धावा देऊन १ बळी घेतला, अशा शब्दांत रिकी पॉंटिंगने दिल्लीच्या खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले. 

दिल्लीचा सलग पाचवा पराभवआयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दिल्लीचा पाचवा सामना आरसीबीसोबत झाला. खरं तर या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला सलग पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबीने २३ धावांनी विजय मिळवून दिल्लीला आणखी एक धक्का दिला. आता दिल्लीचा पुढीला सामना २० एप्रिल रोजी कोलकात नाईट रायडर्सविरूद्ध होणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३दिल्ली कॅपिटल्सकुलदीप यादवसौरभ गांगुलीडेव्हिड वॉर्नर
Open in App