सेहवाग : खेळाप्रति समज शानदारएम.एस. धोनीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वांत चांगला कर्णधार आहे, असे मत भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले. बुधवारी अबूधाबीमध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने केकेआरचा ४९ धावांनी पराभव केला होता. वीरेंद्र सेहवाने या शानदार विजयानंतर रोहित शर्मा चांगला कर्णधार असल्याचे म्हटले. सेहवाग म्हणाला,‘मी नेहमीच म्हटले की या स्पर्धेत एम.एस. धोनीनंतर रोहित शर्मा सर्वोत्तम कर्णधार आहे. रणनीतीमध्ये करीत असलेला बदल आणि खेळाप्रती त्याच्यात असलेली समज यामुळे तो शानदार कर्णधार आहे.’राहुलचे झेल सोडणे चूकच होतीदुबई : पंजाबविरुद्ध झालेल्या ९७ धावांच्या पराभवासाठी स्वत: जबाबदार असल्याची कबुली आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याने दिली. सामन्यानंतर बोलताना कोहली म्हणाला, ‘पहिल्या १५ षटकांच्या खेळापर्यंत आम्ही चांगल्या स्थितीत होतो. पण त्यानंतर जे काही झाले त्यामुळे पराभूत झालो. सर्वांसमोर उभे राहून मला या पराभवाची जबाबदारी घ्यावीच लागेल. दोन झेल सोडल्याने आमचे आव्हान ३५ ते ४० धावांनी वाढले.
कोहलीला १२ लाखाचा दंडदुबई : किंग्ज इलेव्हन पंजाबच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूचा संघ १७ षटकात १०९ धावात गारद झाला. पंजाबला तब्बल ९७ धावांनी मोठा विजय मिळाला. गचाळ क्षेत्ररक्षणामुळे आरसीबीला सामना गमावावा लागलाच शिवाय कोहलीला १२ लाखांचा दंड झाला. कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणादरम्यान षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या नियमानुसार आरसीबीची ही पहिली चूक होती. त्यामुळे कर्णधार कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड करण्यात आला.