Join us  

"त्याला एकही रूपया द्यायची गरज नाही", सुनिल गावस्करांची जोफ्रा आर्चरवर सडकून टीका

sunil gavaskar news : जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे आयपीएल २०२३ मधून बाहेर झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 3:45 PM

Open in App

jofra archer ipl 2023 | नवी दिल्ली : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनेआयपीएल २०२३च्या मध्यातूनच आपल्या संघाची साथ सोडली. आर्चर मुंबई इंडियन्सच्या संघाचा हिस्सा आहे, पण दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्याने यंदाच्या हंगामात केवळ पाच सामने खेळले आहेत. मुंबईच्या फ्रँचायझीने आयपीएल २०२२ च्या लिलावात ८ कोटी रूपयांना त्याला आपल्या ताफ्यात घेतले होते. एवढी रक्कम मिळूनही आर्चरने मुंबईच्या संघाची साथ सोडल्यामुळे भारताचे माजी खेळाडू सुनिल गावस्कर चांगलेच संतापले.

दरम्यान, जोफ्रा दुखापतीमुळे आयपीएल २०२२ मध्ये देखील खेळू शकला नव्हता. आयपीएल सोडून मायदेशात परतलेल्या आर्चरवर गावस्करांनी सडकून टीका केली असून त्याला एकही रूपया द्यायची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच आर्चरने मुंबई इंडियन्सच्या संघाचा विश्वासघात केला असल्याचा आरोप गावस्करांनी केला आहे.

गावस्करांचा हल्लाबोलगावस्करांनी मिड-डेसाठी लिहलेल्या एका लेखात म्हटले, "मुंबई इंडियन्ससाठी जोफ्रा आर्चरचा अनुभव कसा राहिला? मुंबईच्या संघाने त्याच्यावर एवढा पैसा ओतला अन् त्याने माघारी काय दिले? तो १०० टक्के तंदुरूस्त नव्हता तर याबद्दल फ्रँचायझीला सांगायला हवे होते. जेव्हा तो आला तेव्हा त्याला समजले की, तो त्याच्या गतीने गोलंदाजी करू शकत नाही."

तसेच स्पर्धेच्या मध्याला तो त्याच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाने स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांसाठी विदेशात गेला होता. त्यामुळे तो कधीच पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, पण तरीही तो आयपीएल खेळायला आला. जर तो फ्रँचायझीसाठी वचनबद्ध असेल, तर तो खेळत नसला तरीही त्याने शेवटपर्यंत इथेच राहायला हवे होते. परंतु त्याऐवजी त्याने मायदेशी परत जाण्याचा पर्याय निवडला आहे, असे गावस्करांनी अधिक सांगितले. 

'विराट' शतकानंतर कोहलीने पत्नीला केला व्हिडीओ कॉल; अप्रतिम खेळीचं अनुष्काकडून कौतुक

 

 

टॅग्स :आयपीएल २०२३जोफ्रा आर्चरमुंबई इंडियन्ससुनील गावसकरइंग्लंड
Open in App