BCCIचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं भारतीय संघाला वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) सारखा स्फोटक सलामीवीर दिला. सेहवागनं अजय जडेजाच्या नेतृत्वाखाली 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध वन डे संघातून पदार्पण केलं. पण, गांगुलीच्या नेतृत्वाखाली त्याला यश मिळालं. कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा सेहवाग 2002मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा सलामीला आला. त्यानंतर त्यानं इतिहास घडवला. ट्वेंटी-20 मालिकेपूर्वी टीम इंडियाला मिळाली आयसीसीकडून भारी न्यूज; आता इंग्लंडचं काही खरं नाही!
गांगुलीनं त्याला सलामीला खेळण्याची संधी दिली. इंग्लंड दौऱ्यावर गांगुलीनं त्याला सलामी करण्यास सांगितले. सुरूवातीला वीरू सहमत नव्हता. मी मधल्या फळीतील फलंदाज आहे आणि यापूर्वी कधी सलामीला आलेलो नाही, असे त्यानं तेव्हा गांगुलीला सांगितले. पण, गांगुलीन समजूत काझली आणि सेहवाग सलामीला खेळला. गांगुलीनं 2000च्या दशकात टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. भारत-इंग्लंड सामने, आयपीएल २०२१ फायनलपाठोपाठ नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप!
एका चॅनलला मुलाखत देताना गांगुलीनं सुनील गावस्कर यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये दमदार सलामीवीर म्हणजे वीरेंद्र सेहवाग. गांगुलीनं सेहवागचे कौतुक केले. तो म्हणाला,''सुनील गावस्कर यांच्यानंतर कसोटीत सर्वोत्तम सलामीवीर म्हणून वीरूनं स्वतःची ओळख निर्माण केली. कसोटी क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर यांचे सलामीवीर म्हणून अमुल्य योगदान आहे. त्यांच्यानंतर सेहवागनं सलामीला खेळताना अनेकदा मॅच विनिंग खेळी केली.'' टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेत कोणत्या जर्सीत दिसणार?; खेळाडूंनी पोस्ट केले फोटो
वीरूनं 104 कसोटी सामन्यांत 49.34 च्या सरासरीनं 8586 धावा केल्या. 319 ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी असून त्याच्या नावावर 23 शतकं व 32 अर्धशतकं आहेत.