नवी दिल्ली : प्रशिक्षकपद मिळाल्यावर काही व्यक्ती आपल्या नावडत्या खेळाडूंना संघातून बाहेर काढतात. आता हीच गोष्ट सर्वांना पाहायला मिळते आहे. इंग्लंडमध्ये विश्वचषक झाला आणि त्यानंतर बऱ्याच संघांच्या प्रशिक्षकांवर टांगती तलवार आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाल्यावर रवी शास्त्री यांच्या पदावरही टांगती तलवार होती. बऱ्याच जणांच्या मुलाखतीही या पदासाठी झाल्या होत्या. पण त्यानंतर रवी शास्त्री यांचीच निवड मुख्य प्रशिक्षक पदसाठी करण्यात आली. आता दुसऱ्या पर्वात शास्त्री यांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे.
भारताबरोबर पाकिस्तानमध्येही प्रशिक्षक बदलण्यात आले. आता पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदी माजी कर्णधार मिसबाह उल हकची निवड करण्यात आली आहे. मिसबाहने आता पाकिस्तानच्या संघातून वरीष्ठ खेळाडूंना बाहेर काढण्याचे काम केले आहे. मिसबाहने पहिल्याच निवड समितीच्या बैठकीमध्ये संघातूल शोएब मलिक आणि मोहम्मद हफीझ यांचा पत्ता कट केल्याचे पाहायला मिळते आहे.
पाकिस्तानचा संघ : सर्फराज अहमद, बाबर आझम, आबिद अली, अहमद शहजाद, इफ्तिखार अहमद, इमाम वसीम, इमाम-उल-हक, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, आसिफ अली, फहीम अशरफ, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, शादाब खान, उमर अकमल, उस्मान शिनवारी आणि वहाब रियाज.