Shoaib Akhtar Sachin Tendulkar : अल्लाहनंतर सचिन तेंडुलकरच!; मास्टर ब्लास्टरमुळे मी स्टार झालो, शोएब अख्तरने सांगितला १९९९ चा किस्सा

२००३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सचिन तेंडुलकरने सेंच्युरियन मैदानावर अख्तरचा बाऊन्सरवर पॉईंटच्या दिशेने मारलेला षटकार आजची डोळ्यासमोर ताजा वाटतो. त्याआधी १९९९साली आशियाई कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील इडन गार्डनवर झालेली लढत सर्वांच्या चांगली लक्षात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 03:58 PM2022-06-10T15:58:20+5:302022-06-10T16:07:07+5:30

whatsapp join usJoin us
‘After God, Sachin Tendulkar Has Biggest Hand In Making Me A Star’- Shoaib Akhtar On Bowling Tendulkar For A Golden Duck In 1999 Test | Shoaib Akhtar Sachin Tendulkar : अल्लाहनंतर सचिन तेंडुलकरच!; मास्टर ब्लास्टरमुळे मी स्टार झालो, शोएब अख्तरने सांगितला १९९९ चा किस्सा

Shoaib Akhtar Sachin Tendulkar : अल्लाहनंतर सचिन तेंडुलकरच!; मास्टर ब्लास्टरमुळे मी स्टार झालो, शोएब अख्तरने सांगितला १९९९ चा किस्सा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याने महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याचे आभार मानले आहे. भारताच्या महान फलंदाजामुळे आपण स्टार झाल्याची कबुली रावळपिंडी एक्स्प्रेसने दिली. India vs Pakistan यांच्यातल्या क्रिकेट सामन्यात खेळाडूंमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळायचा. त्यात शोएब वि. सचिन या लढाईची साऱ्यांनाच उत्सुकता असायची. 

२००३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सचिन तेंडुलकरने सेंच्युरियन मैदानावर अख्तरचा बाऊन्सरवर पॉईंटच्या दिशेने मारलेला षटकार आजची डोळ्यासमोर ताजा वाटतो. त्याआधी १९९९साली आशियाई कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील इडन गार्डनवर झालेली लढत सर्वांच्या चांगली लक्षात आहे. त्या सामन्यात अख्तरने सलग दोन चेंडूंत राहुल द्रविड व सचिन यांची विकेट घेत प्रेक्षकांना शांत केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सचिन प्रथमच गोल्डन डकवर बाद झाला होता.

त्या प्रसंगाची आठवण करून देताना शोएबने पाकिस्तानचा माजी फिरकीपटू साकलेन मुश्ताकसह मनमोकळ्या गप्पांचा किस्सा सांगितला. तो म्हणाला,''क्रिकेटचा देव कोण?, हे मी तेव्हा विचारले होते. तेव्हा त्याने त्वरित सचिन तेंडुलकरचे नाव घेतले. तेव्हा मी मुश्ताकला म्हणालो, जर मी त्याला बाद केले तर... त्याने मला सांगितले की मी मागील दोन कसोटीत त्याला बाद केले आहे. इडन गार्डन व संपूर्ण देशात त्याचे चाहते आहेत. तेव्हा सचिनला कोण बाद करणार, यावरून माझ्यात व मुश्ताक याच्यांत चर्चांच्या फेऱ्या रंगल्या.''

''राहुल द्रविडला बाद केल्यानंतर सचिन तेंडुलकर मैदानावर आला. सचिन मैदानावर पाऊल ठेवताच प्रेक्षकांनी जो जयघोष केला, त्याने माझी कानठळी बसली. तो आवाज प्रचंड होता आणि हे मी प्रथमच अनुभवत होतो. जवळपास लाखभर लोकं सचिनचा जयघोष करत होती. तेव्हा मुश्ताक मला म्हणाला, तुझी वेळ आलीय, तू त्याला जाऊ देणार आहेस का?. मी म्हणालो नाही,''असे शोएबने सांगितले.  

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १८५ धावा केल्या आणि ७० धावा करणारा मोईन खान हा त्यांचा स्टार ठरला. जवागल श्रीनाथने ४६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात एस रमेशच्या ७९ धावांच्या जोरावर भारताने २२३ धावा केल्या. सचिन कसोटीत प्रथमच गोल्डन डकवर बाद झाला. शोएबने त्या डावात ७१ धावांत ४ विकेट्स घेतल्या.

सचिनला बाद करण्यावर शोएब म्हणाला,''सचिन आरामात चालत होता आणि तो क्रिजवर येईपर्यंत मी माझ्या स्टार्ट पॉईंटपर्यंत पोहोचलो आणि धावण्यास सुरुवात केली. सचिन तेव्हा तयारही नव्हता. स्टेडियमवर आवाज एवढा होता की मला कर्णधार वसीम अक्रमचे बोलणेच ऐकू येत नव्हते. सचिनला बाद करण्यासाठी माझी उत्सुकता वाढत चालली होती. सचिन फलंदाजीला तयार झाल्यानंतर मी यॉर्कर टाकला आणि विकेट मिळवली. स्टेडियमवर स्मशानशांतता पसरली. सचिनला बाद केल्यानंतर मी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलो. अल्लाहनंतर जर कोणी मला स्टार बनवले असेल तर तो सचिन तेंडुलकर आहे.''

Web Title: ‘After God, Sachin Tendulkar Has Biggest Hand In Making Me A Star’- Shoaib Akhtar On Bowling Tendulkar For A Golden Duck In 1999 Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.