Hardik Pandya News : गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल मागील काही दिवसांमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सर्वप्रथम हार्दिक मुंबई इंडियन्सच्या संघात जाणार असल्याची बातमी पसरली. मात्र, पुन्हा एकदा चर्चांना पूर्णविराम देत तो कायम गुजरातच्या ताफ्यात राहणार असल्याचे समोर आले. परंतु, सोमवारी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीपाठोपाठ हार्दिकने देखील पलटनच्या ताफ्यात जाण्यासाठी सज्ज असल्याचे जाहीर केले. हार्दिकची घरवापसी झाल्यानंतर मुंबईचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र भन्नाट मीम्स व्हायरल करून नेटकरी मजा घेत आहेत.
दरम्यान, क्रिकेट वर्तुळात मागील दोन दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू असलेला हार्दिक पांड्या आज अधिकृतरित्या मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य झाला. पांड्याने आपल्या संघात घरवापसी केली असून आयपीएल २०२४ मध्ये तो मुंबईच्या ताफ्यात दिसणार आहे. हार्दिक पांड्याला त्याच्या घरच्या संघात जायचे होते, त्याचीच इच्छा असल्याकारणानेच त्याला मुंबईच्या संघात पाठवले गेले, असे गुजरातच्या फ्रँचायझीने स्पष्ट केले.
मुंबईच्या ताफ्यात 'हार्दिक' स्वागत
मुंबईच्या फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून हार्दिकची घरवापसी होत असल्याचे जाहीर केले तसेच त्याचे आपल्या ताफ्यात स्वागत केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आपल्या पदार्पणाच्या (२०२२) हंगामातच विक्रम नोंदवला. पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातच्या संघाला पहिल्याच हंगामात किताब जिंकण्यात यश आलं. मात्र, हार्दिकच्या जाण्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. खरं तर गुजरातच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंची मोठी फळी असून शुबमन गिल व्यतिरिक्त, केन विल्यमसन, मोहम्मद शमी, वृद्धिमान साहा, विजयशंकर, साई किशोर, राशिद खान, डेव्हिड मिलर हे नामांकित खेळाडू गुजरातच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने गुजरातच्या संघाची धुरा भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली. गिलसह टायटन्सच्या सर्व खेळाडूंनी मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचे नेतृत्व करण्यात हार्दिक यशस्वी ठरला.
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Web Title: After Gujarat Titans captain Hardik Pandya joins Mumbai Indians squad for IPL 2024, funny memes are going viral on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.