नवी दिल्ली : कधी कोणावर कशी वेळ येइल, हे सांगता येत नाही. आयुष्यात संकंटे येतात. पण या संकंटांतून बाहेर कसे पडायचे, हे तुम्ही ठरवायचे असते. काही जणं फक्त संकटातून बाहेर कसे पडता येईल, याचा विचार करतात. पण काही जणं फक्त विचारंच करत नाहीत, तर ते विचार कृतीतून उतरवतात. आपला मार्ग निवडतात आणि एक आदर्श लोकांपुढे ठेवतात. अशीच एक गोष्ट घडली आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने या गोष्टीला प्रोत्साहन दिले आहे.
उत्तर प्रदेशातील बनवारी टोला गावातील नेहा आणि ज्योति यांचे वडिल 2014 साली आजारी पडले. तोपर्यंत घराची जबाबदारी त्यांच्या वडिलांवरच होती. पण ते आजारी पडल्यावर मात्र या दोघींनी घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या दोघींनी केशकर्तनालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या केशकर्तनालयामध्ये लोकंच येत नव्हती. एका महिलेच्या हातून आम्ही केस कसे कापून घ्यायचे, असा विचार लोकं करत होती. पण अखेर त्यांच्या आयुष्यात सुखद गोष्ट घडली. जिलेट या कंपनीने त्यांची ही प्रेरणादायी कहाणी लोकांपुढे मांडली. त्यांची ही कहाणी यूट्यूबवर 1.60 कोटी लोकांनी पाहिली. त्यानंतर सचिनने या दोघींकडून दाढी करण्याचा निर्णय घेतला.
याबाबत सचिन म्हणाला की, " आतापर्यंत मी कधीही घराबाहेर शेविंग केली नव्हती. आज हा विक्रम मोडीत निघाला. महिला बार्बर शॉपमध्ये शेविंग करणे हा एक सन्मान आहे."