Join us  

Axar Patel: केएल राहुलपाठोपाठ अक्षर पटेल पत्नीसह 'महाकाल'च्या चरणी नतमस्तक, VIDEO 

axar patel wife: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 5:34 PM

Open in App

इंदूर : सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. मात्र, भारतीय फलंदाजांना साजेशी फलंदाजी करता आली नाही.

दरम्यान, पहिल्या दोन सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. 1 मार्चपासून मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी लोकेश राहुल आणि अक्षर पटेल यांनी पत्नीसह मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. राहुलने रविवारी तर अक्षर पटेलने सोमवारी महाकालचे दर्शन घेतले.

भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलने 84 धावांची खेळी करत भारताची धावसंख्या 400 च्या पुढे नेली होती. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात अक्षरने 74 धावांची खेळी खेळून भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात मदत केली. 

अक्षर पटेल 'महाकाल'च्या चरणी नतमस्तक महाकालच्या मंदिरात पोहोचल्यानंतर अक्षर आणि त्याच्या पत्नीने सुमारे दोन तास महाकाल मंदिराच्या नंदी हॉलमध्ये बसून पहाटे चार वाजता होणाऱ्या भस्म आरतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये अक्षर पटेल आणि मेहा हात जोडून महाकालचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. भारतीय संघ 1 मार्चपासून इंदूर येथे तिसरा कसोटी सामना खेळणार आहे.

 तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअक्षर पटेललोकेश राहुलअथिया शेट्टी उज्जैन
Open in App