मोठा झटका! केएल राहुलची WTC Final मधून माघार; म्हणतो, देश हेच प्राधान्य, पण...

kl rahul injury update today : लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुल आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला देखील मुकणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 04:14 PM2023-05-05T16:14:10+5:302023-05-05T16:14:46+5:30

whatsapp join usJoin us
After Indian team player KL Rahul's exit from the IPL 2023, he has now withdrawn from the World Test Championship final against Australia and thanked the BCCI | मोठा झटका! केएल राहुलची WTC Final मधून माघार; म्हणतो, देश हेच प्राधान्य, पण...

मोठा झटका! केएल राहुलची WTC Final मधून माघार; म्हणतो, देश हेच प्राधान्य, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2023) लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) कर्णधार लोकेश राहुल आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर आता जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC Final 2023) अंतिम सामन्याला देखील मुकणार आहे. राहुलने लांबलचक पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. 

राहुलने पोस्टमध्ये म्हटले, "काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आणि वैद्यकीय टीमशी सल्लामसलत केल्यानंतर, असे समोर आले की, माझ्या मांडीवर लवकरच शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे आगामी काही दिवस मला विश्रांतीची गरज आहे. हा निर्णय घेणे खरोखर कठीण आहे, परंतु मला माहिती आहे की, ठीक होण्यासाठी हा निर्णय योग्य आहे." 

तसेच लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा कर्णधार या नात्याने यावेळी संघासोबत नसल्याने खूप वेदना होत आहेत. पण मला खात्री आहे की, माझ्या संघातील शिलेदार या प्रसंगाला सामोरे जातील आणि नेहमीप्रमाणे त्यांची सर्वोत्तम कामगिरी करतील. मी पुढच्या महिन्यात भारतीय संघासोबत ओव्हलवर नसणार हे पूर्णपणे निराशाजनक आहे. ब्ल्यू जर्सीत पुनरागमन करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असेही राहुलने म्हटले. 

BCCIचे मानले आभार
राहुलने बीसीसीआयचे आभार मानताना म्हटले की, मला सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ज्यांनी मला परत येण्याचे बळ दिले. लखनौच्या संघाचे व्यवस्थापन आणि BCCI त्यांच्या तत्परतेबद्दल तसेच पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. "मी लवकरच मैदानात परत येण्याची आशा करतो. गेले काही दिवस खरोखरच कठीण गेले आहेत, परंतु मी पुनरागमन करण्याचा निर्धार केला आहे. दुखापती कधीच सोप्या नसतात, पण मी नेहमीप्रमाणेच देशासाठी माझे सर्व काही देईन. सर्व समर्थन आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद", असे राहुलने अधिक म्हटले.

WTC फायनलसाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: After Indian team player KL Rahul's exit from the IPL 2023, he has now withdrawn from the World Test Championship final against Australia and thanked the BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.