मुंबईः 2011च्या वर्ल्ड कपचा हिरो युवराज सिंग यानं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत युवराज सिंग यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत असल्याचं जाहीर करून टाकलं. पुढे तो म्हणाला, लहानपणापासूनच मी वडिलांचं देशासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत आणि खास करून 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रवासात अनेक चढउतार पाहिले. आता मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळानं कसं लढायचं, पडायचं आणि पुन्हा उठून कसं पुढे जायचं हे मला शिकवलं. यावेळी युवराजनं निवृत्तीसंदर्भात क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरशीही सल्ला-मसलत केल्याचं सांगितलं.सचिननं मला सांगितलं की, तुझी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द संपुष्टात आणायची की नाही, याचा निर्णय तुलाच घ्यायचा आहे. हा निर्णय तुझ्याशिवाय कोणीही घेऊ शकत नाही. त्यानंतर मी हा निवृत्तीचा निर्णय घेतल्याचंही युवराज सिंग म्हणाला. यापुढे मी कॅन्सरग्रस्त रुग्णांची सेवा करणार असल्याचंही त्यानं सांगितलं आहे. मला जास्त टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही, याची खंत आहे. त्यानंतर कोणत्या क्रिकेटपटूमध्ये तू स्वतःला पाहतोस हा प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला, ऋषभ पंत चांगला खेळाडू आहे. त्यात मला स्वतःची प्रतिमा दिसते.युवराज सिंगनं दिली होती कॅन्सरशी झुंज युवराज सिंगनं वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याला कॅन्सरनं पछाडलं होतं. त्याला दोन्ही फुफ्फुसांमध्ये ट्युमर असल्याचं समजलं होतं. त्यानंतर त्यानं निकरानं या आजाराशी लढा दिला. जसं की त्यानं विरोधकांना हरवलं होतं. तो पूर्णतः तंदुरुस्त झाल्यानंतर पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरला. परंतु त्याची कामगिरी पहिल्यासारखी राहिली नाही. अखेर त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीच्या निर्णयासंदर्भात तेंडुलकरनं दिला युवीला 'हा' सल्ला!लहानपणापासून ज्याला आदर्श मानलं त्याच्यासोबत खेळण्याची संधी मला मिळाली. त्याच्यासोबत वर्ल्ड कप उंचावण्याचा मान युवीला मिळाला. त्यामुळे वर्ल्ड कपमधून निवृत्ती होण्यापूर्वी युवीनं आवर्जुन तेंडुलकरचा सल्ला घेतला. निवृत्तीचा निर्णय तुझ्यावर आहे, लोकांकडे लक्ष नको देऊस, हा सल्ला तेंडुलकरने त्याला दिला. भारतीय संघाचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगनं सोमवारी आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मागील दोन वर्ष मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या युवीला हा निर्णय जाहीर करताना भावनांवर नियंत्रण राखणे जड जात होतं. निवृत्ती घेण्याचा निर्णय हा वर्षभरापूर्वीच घेण्याचा विचार केला होता, असे युवीनं सांगितले.युवीनं 40 कसोटी सामन्यांत 33.92 च्या सरासरीनं 1900 धावा केल्या आणि 9 विकेट्सही घेतल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 304 सामने आहेत आणि त्यात त्याने 36.55च्या सरासरीनं 8701 धावा केल्या. वन डे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 111 विकेट्सही आहेत. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 58 सामन्यांत 1177 धावा व 28 विकेट्स घेतल्या आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Yuvraj Singh's Retirement: निवृत्तीनंतर युवराज करणार समाजासाठी काही तरी, काय ते जाणून घ्या!
Yuvraj Singh's Retirement: निवृत्तीनंतर युवराज करणार समाजासाठी काही तरी, काय ते जाणून घ्या!
2011च्या वर्ल्ड कपचा हिरो युवराज सिंग यानं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 2:47 PM