Join us  

IPL 2021 स्थगित झाल्यानंतर, भारतीय क्रिकेटला बसणार दुसरा मोठा धक्का, पाकिस्तानी मीडियाचा दावा!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 5:57 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कोलकात नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं हा निर्णय घ्यावा लागला. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच होता. कोरोना व्हायरसच्या नकारात्मक परिस्थितीत आयपीएलमुळे काही काळ का होईना, सकारात्मक ऊर्जा सर्वांना मिळत होती. पण, आता आयपीएलच होणार नसल्यानं क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. त्यात BCCI व भारतीय चाहत्यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेव्हिड वॉर्नरचा तळतळाट लागला अन् लीग करावी लागली स्थगित, पाहा भन्नाट मीम्स

भारतात दररोज तीन ते साडेतीन लाख रुग्ण वाढत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य यंत्रणेवरही प्रचंड ताण पडलेला दिसत आहे. देशातील कोरोना परिस्थिती गंभीर असतानाही बीसीसीआयन आयपीएल आयोजनाचे आव्हान स्वीकारले, परंतु मध्यांतरानंतर त्यांच्या वाट्याला अपयश आलं. आयपीएल आयोजनावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचीही नजर होती. कारण आयपीएलच्या यशस्वी आयोजनानंतर देशात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या नियोजनाला गती येणार होती. पण, आता भारताला वर्ल्ड कप यजमानपद गमवावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासाठी आणखी एक वाईट बातमी!

पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्र डेली डॉन ( Daily Dawn) यांनी दिलेल्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) अमिराती क्रिकेट बोर्डाशी ( ECB) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१च्या आयोजनाबद्दल संपर्क साधला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज अज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यापार्श्वभूमीवर बीसीसीआय व आयसीसी या दोघांनीही भारतात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आयोजन अवघड असल्याचे मान्य केले आहे. डॅडी लवकर घरी या, आम्ही तुम्हाला मिस करतोय!; डेव्हिड वॉर्नरच्या मुलीची भावनिक पोस्ट व्हायरल!

''ट्वेंटी-२० वर्ल्ड कप यूएईत आयोजन करण्यासाठी आयसीसीनं ECBशी चर्चा सुरू केली आहे. ८० ते ९० टक्के बोलणं पूर्ण झालं आहे आणि लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल,''असे सूत्रांच्या हवाले Dawn ने सांगितले आहे. आता आयसीसी व बीसीसीआय यांच्यात अंतिम चर्चा सुरू आहे व पुढील दोन आठवड्यांत अधिकृत घोषणा केली जाईल, असाही दावा या वृत्तपत्रानं केला आहे. आता आम्ही घरी जायचं कसं ?; BCCI कडूनही उत्तर मिळेना, परदेशी खेळाडू झालेत असहाय व चिंताग्रस्त!    

टॅग्स :आयपीएल २०२१आयसीसीटी-20 क्रिकेटआयसीसी विश्वचषक टी-२०