रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले. श्रीलंकेविरुद्धची तिसरी ट्वेंटी-२० लढत जिंकून भारताने सलग १२ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याच्या अफगाणिस्तान व रोमानिया यांच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. आता भारताला या दोन्ही संघांना मागे टाकून एक नवा विश्वविक्रम नोंदवण्याची संधी आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वानंतर भारतीय संघ पाच सामन्यांची ट्वेंटी-२०मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.
२६ मार्च ते २९ मे या कालावधीत IPL 2022 खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पाच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत भारताला सलग १२ ट्वेंटी-२० सामन्यांच्या पुढे जाऊन नवा विश्वविक्रम नोंदवण्याची संधी आहे. हा विक्रम अन्य संघांना मोडणे तितका सोपी नक्की नसेल. जून महिन्यात आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येईल आणि या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारत सलग १३ विजय मिळवण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवेल. बीसीसीआयच्या बैठकित भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० मालिकेचा निर्णय घेतला गेला.
९ जून ते १९ जून या कालावधीत ही मालिका होण्याची शक्यता आहे. कटक, व्हायझॅक, दिल्ली, राजकोट व चेन्नई या पाच शहरांमध्ये या मालिकेचे सामने खेळवण्यात येतील.
भारतीय संघ या दौऱ्यावर दुसऱ्या फळीचा संघ पाठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि यष्टिरक्षक रिषभ पंत, जसप्रीत बुमराह हे आयर्लंडविरुद्ध खेळणार नाही. १ ते ५ जुलै या कालावधीत इंग्लंडविरुद्ध स्थगित झालेला एकमेव सामना होणार आहे आणि त्यासाठी हे खेळाडू आयर्लंडविरुद्ध उपलब्ध नसतील. मागच्या वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता आणि पाच सामन्यांच्या मालिकेत त्यांनी २-१ अशी आघाडी घेतली आहे. अखेरच्या कसोटीपूर्वी भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि ती
कसोटी स्थगित करावी लागली होती. भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रकपाचवी कसोटी - १ ते ५ जुलै २०२२, एडबस्टन
ट्वेंटी-२० मालिका पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉलदुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टनतिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज
वन डे मालिका पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हलदुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्सतिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड