Join us  

केन विल्यमसन विश्वचषकातून बाहेर अन् बाबरची खेळभावना; २ ओळीत चाहत्यांची जिंकली मनं

kane williamson injury ipl 2023 : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झालेल्या केन विल्यमसनसाठी खास संदेश दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 1:39 PM

Open in App

babar azam । नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झालेल्या केन विल्यमसनसाठी खास संदेश दिला आहे. बाबरने विल्यमसन लवकरात लवकर ठिक व्हावा याबाबत एक ट्विट केले आहे. न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येण्यापूर्वी बाबरने किवी संघाचा माजी कर्णधार बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. खरं तर न्यूझीलंडचा दिग्गज आगामी वन डे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. 

दरम्यान, आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे विल्यमसनसह किवी संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. गुडघ्याची दुखापत गंभीर असल्यामुळे विल्यमसनला उपचारासाठी ऑकलंडला नेण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याला पुढील काही महिने विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणूनच तो आगामी विश्वचषकाला देखील मुकणार आहे. 

विल्यमसनसाठी बाबरचा मेसेजकेन विल्यमसन लवकर बरा व्हावा यासाठी पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने प्रार्थना केली आहे. बाबरने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "आशा आहे लवकरच पुनरागमन करशील. लवकर बरा व्हावा यासाठी मी प्रार्थना करतो." लक्षणीय बाब म्हणजे न्यूझीलंडचा संघ आगामी काळात ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. 

खरं तर आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना चेन्नईविरूद्धच्या सामन्यातील १३व्या षटकांत विल्यमसनला दुखापत झाली. ऋतुराज गायकवाडने मारलेला षटकार रोखण्याच्या प्रयत्नात असलेल्या विल्यमसनच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याने खेळ काही वेळ थांबवण्यात आला होता. विल्यमसनने शानदार क्षेत्ररक्षण करून षटकार रोखला याशिवाय झेल देखील पकडला मात्र सीमारेषेच्या बाहेर जाण्याआधी त्याने चेंडू आत मैदानात फेकला. सामना झाल्यानंतर विल्यमसनला स्कॅनसाठी नेण्यात आले, त्यानंतर समोर आले की त्याला ठीक होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. विल्यमसनच्या जागी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून साई सुदर्शनने फलंदाजी केली होती. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

  

टॅग्स :केन विल्यमसनबाबर आजमपाकिस्तानआयपीएल २०२३गुजरात टायटन्स
Open in App