लीड्स - इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. संघनिवडीपेक्षा रोहित शर्माला वगळल्याची चर्चा अधिक होती. त्याच्याएवजी संघात करूण नायरला संधी देण्यात आली. दक्षिण आफ्रिका मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर रोहितला इंग्लंड कसोटी मालिकेत संघात स्थान मिळणार नाही याची भिती होती आणि बुधवारी ती खरी ठरली. 31 वर्षीय रोहित पाच दिवसांच्या सामन्यांत स्वत:ची छाप पाडण्यात तो अपयशी ठरला. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वन डेत त्याने शतक झळकावले होते. पण पुढील दोन्ही सामन्यांत तो अपयशी ठरला. तिस-या वन डेत त्याने 21 चेंडूंत केवळ 4 धावा केल्या आहेत. कसोटी संघात स्थान न मिळाल्यानंतर रोहितने आपल्या चाहत्यांसाठी ट्विटरवर मॅसेज लिहिला. सुर्योदय पुन्हा होईल, असे ट्विट त्याने केला आहे. या मॅसेजद्वारे त्याने भविष्यात कसोटी संघात पुनरागमन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
मुंबई इंडियन्सने रोहितच्या ट्विटला रिट्विट करून धीर दिला आहे.