मुंबई : सोशल मीडीयावर चांगला अॅक्टिव्ह असणारा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwagh) नेहमीच आपल्या कमेंट्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतो. सध्या सुरु असलेल्या Indian Premier League (IPL 2020) १३व्या पर्वातही तो सोशल मीडियावर अनेक मेसेज पोस्ट करत सर्वांचे मनोरंजन करत आहे. आयपीएलमध्ये सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांची चर्चा नेहमीच होत असते. मात्र आता सेहवागने आयपीएलमधील बेस्ट कॅप्टन कोण यावर आपले मत मांडले आहे. इतकंच नाही, तर दोन खेळाडू आहेत ज्यांना सेहवागने बेस्ट मानले आहे.
आतापर्यंत झालेल्या यंदाच्या आयपीएल सामन्यांनंतर सेहवागने आपल्या परीने बेस्ट कॅप्टन कोण हे सांगितले आहे. एका मुलाखतीमध्ये सेहवागने हे वक्तव्य केले असून त्यानुसार त्याने चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार ‘थाला’ महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma) याला सर्वोत्तम कर्णधार म्हटले आहे. IPL 2020 Updates
IPL 2020 : आम्हालाही तो आदर मिळायला हवा, असं नाही का वाटत? गावस्करांच्या कमेंटवर अनुष्का भडकली
IPL 2020 : वादळी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलला राजस्थान रॉयल्सचा अजब सल्ला, ट्विट व्हायरल
IPL 2020 : डीन जोन्स यांना वाचविण्याचा ब्रेट ली याने केला होता खूप प्रयत्न
कोलकाताविरुद्ध रोहितने ज्याप्रकारे संघाचे नेतृत्त्व केले, ते पाहून सेहवाग अत्यंत प्रभावित झाला. यामुळेच त्याने, ‘आयपीएलमध्ये धोनीनंतर रोहित हाच सर्वोत्तम दुसरा कर्णधार आहे,’ असे म्हटले. सेहवागने सांगितले की, ‘ज्याप्रकारे केकेआरचे सलामीवीर सुनील नरेन, शुभमान गिल यांच्यासह नितिश राणाविरुद्ध रोहितने जी रणनिती आखली, ती जबरदस्त होती. मी नेहमीच सांगितले आहे की, आयपीएलमध्ये धोनीनंतर रोहित हाच सर्वोत्तम कर्णधार आहे. ज्याप्रकारे खेळाला तो समजून घेतो आणि आपल्या रणनिती आखतो, ते कमालीचे आहे’ IPL 2020 Updates
‘जेव्हा डावखुरा नितिश राणा आणि कर्णधार दिनेश कार्तिक खेळपट्टीवर सेट झाले होते, तेव्हा रोहितने चेंडू किएरॉन पोलार्डकडे दिला. इतर कोणत्याही कर्णधाराने यावेळी राणाविरुद्ध लेफ्ट आर्म स्पिनरला गोलंदाजी दिली असती, पण रोहितने हटके विचार केला आणि पोलार्डला गोलंदाजी दिली आणि त्याचा फायदा मुंबईला झाला,’ असे सेहवाग म्हणाला. IPL 2020 Updates
लॉकडाऊन मे बस....; विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्यावरील सुनील गावस्कर यांच्या कमेंटवरून वाद
IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच नव्हे, तर यापूर्वीही MS Dhoni च्या निर्णयाचा संघाला बसलाय फटका
त्याचप्रमाणे, ‘तुफानी फटकेबाजीसाठी ओळखला जाणाºया केकेआरचा सलामीवीर सुनील नरेनला रोखण्यासाठी रोहितने आपल्या सर्वोत्तम गोलंदाजांना आक्रमणासाठी बोलावले. रोहितच्या कमालीच्या नेतृत्त्वामुळेच मुंबईला विजय मिळवता आला,’ असेही सेहवागने म्हटले.
Web Title: After Mahendra Singh Dhoni, Who is the best captain?; Virender Sehwag give answer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.