ही हा हा हा... निरोपाची कसोटी खेळण्याची संधी न मिळाल्यानं ख्रिस गेलला 'याड' लागलं!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : घरच्या मैदानावर अखेरचा कसोटी सामना खेळण्याचे ख्रिस गेलचे स्वप्न अपूर्ण राहिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 05:09 PM2019-08-30T17:09:19+5:302019-08-30T17:09:50+5:30

whatsapp join usJoin us
After missing out on farewell Test at home, Chris Gayle makes alternative plans, watch video | ही हा हा हा... निरोपाची कसोटी खेळण्याची संधी न मिळाल्यानं ख्रिस गेलला 'याड' लागलं!

ही हा हा हा... निरोपाची कसोटी खेळण्याची संधी न मिळाल्यानं ख्रिस गेलला 'याड' लागलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : घरच्या मैदानावर अखेरचा कसोटी सामना खेळण्याचे ख्रिस गेलचे स्वप्न अपूर्ण राहिले. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी जाहीर केलेल्या संघात विंडीजनं गेलला स्थान दिलेले नाही. त्यामुळे गेलला घरच्या मैदानावर निरोपाचा कसोटी सामना खेळता येणार नाही. संघात स्थान न मिळाल्यानं गेलनं मड बाथ घेतल्याचे फोटो शुक्रवारी इंस्टाग्रामवर शेअर केले. गेलचे हे फोटो पाहून त्याला 'याड' लागले का, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. 

मार्च 2000 मध्ये गेलने पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर 103 कसोटी सामन्यांत त्यानं 42+ च्या सरासरीनं 7214 धावा केल्या. पण, 2014नंतर त्याने विंडीजकडून कसोटी सामना खेळलेला नाही. बांगलादेशविरुद्ध 2014 मध्ये त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला होता.

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे गेलने जाहीर केले होते, परंतु त्यानंतर त्याने भारताविरुद्ध खेळण्याची इच्छा व्यक्त केली. भारताने वन डे मालिकेत विजय मिळवला.

त्यानंतर पुन्हा एकदा गेलने निवृत्तीच्या वृत्ताचा इन्कार केला आणि मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.


भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत गेलला स्थान देऊन निरोपाचा सामना खेळवण्याची शक्यता होती. पण, विंडीज बोर्डानं त्याला संघात स्थान दिले नाही. त्यामुळे गेलने दुसऱ्या कसोटी दरम्यानचा प्लान काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. 

पाहा व्हिडीओ..


 

Web Title: After missing out on farewell Test at home, Chris Gayle makes alternative plans, watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.