MS Dhoni, Virat Kohli नंतर आणखी एका बड्या खेळाडूने दिले कर्णधारपद सोडण्याचे संकेत

संघाचं कर्णधारपद सोडलं तरी संघासाठी खेळत राहणार, असं तो म्हणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 07:44 PM2022-03-24T19:44:18+5:302022-03-24T19:45:11+5:30

whatsapp join usJoin us
After MS Dhoni Virat Kohli this big cricketer hints to leave captaincy | MS Dhoni, Virat Kohli नंतर आणखी एका बड्या खेळाडूने दिले कर्णधारपद सोडण्याचे संकेत

MS Dhoni, Virat Kohli नंतर आणखी एका बड्या खेळाडूने दिले कर्णधारपद सोडण्याचे संकेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022 ची सुरूवात २६ मार्चपासून होणार आहे. CSK vs KKR असा पहिला सामना रंगणार आहे. पण त्याआधी गुरूवारी चेन्नईच्या संघाने मोठी घोषणा केली. MS Dhoni ने चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि Ravindra Jadeja ला नवा कर्णधार नेमण्यात आले. त्यामुळे यंदाच्या हंगामात धोनी संघाचा कर्णधार नसेल. त्याशिवाय, Virat Kohli नेदेखील गेल्या वर्षीच भारतीय संघाच्या आणि RCB संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. तशातच आता महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली पाठोपाठ आणखी एक बडा खेळाडू कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

--

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला तेव्हा सर्व क्रिकेटप्रेमींना धक्का बसला होता. संघ चांगल्या स्थितीत असताना पद सोडण्याच्या त्याच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. तशातच पद्धतीने आता इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) यानेदेखील कसोटी कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. इंग्लंडचा संघ विंडिजविरूद्ध गुरूवारपासून कसोटी सामना खेळत आहे. हा सामना त्याचा कसोटी कर्णधार म्हणून शेवटचा सामना असू शकतो असं बोललं जात आहे. २०१७ साली एलिस्टर कूकच्या राजीनाम्यानंतर रूटला ही जबाबदारी मिळाली होती.

ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका ४-०ने गमावल्यानंतर जो रूटला इंग्लंडच्या कर्णधारपदावरून हटवा अशी मागणी करण्यात आली होती. याबाबत बोलताना रूट म्हणाला की, मला असं वाटतं की संघाला अशा परिस्थितीत पुढे घेऊ जाण्यास मी योग्य माणूस आहे. पण जर आमच्या प्रशिक्षकांना काही वेगळं वाटत असेल तर मला यावर अधिक काही बोलायचं नाही. तो त्यांचा निर्णय असेल. जर मी संघाचं कर्णधारपद सोडलं तरीही मी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पूर्वीइतकेच प्रयत्न करेन.

Web Title: After MS Dhoni Virat Kohli this big cricketer hints to leave captaincy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.