Indian Premier League ( IPL 2020) मध्ये अम्पायरकडून होणाऱ्या चुका यात काही नवं नाही. आयपीएलच्या १३व्या पर्वातही अशा चुका झालेल्या पाहायला मिळत आहेत. किंग्स इलेव्हन पंजाबला ( Kings XI Punjab) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या ( Delhi Capitals) सामन्यात मोठा फटका बसला. त्यानंतर मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातील लढतीतही असाच एक प्रकार घडला. पण, त्याचा मध्यंबिंदू होता तो CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) ...
चेन्नईच्या ६ बाद १६७ धावांचा पाठलाग करताना हैदराबादला ८ बाद १४७ धावाच करता आल्या. या सामन्यात पुन्हा धोनीचा पारा चढलेला पाहायला मिळाला आणि तो रुद्रावतार पाहून अंपायर पॉल रैफेल यांनी निर्णय बदलला. हैदराबादच्या डावात शार्दूल ठाकूरनं १९वं षटक फेकलं. त्या षटकाचा दुसरा चेंडू Wide होता. शार्दूलचा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फसला होता, अंपायर पॉल रैफेल हा व्हाईड हा निर्णय देणारच होते. तितक्यात महेंद्रसिंग धोनीचा रुद्रावतार पाहून त्यांनी निर्णय बदलला. त्यामुळे धोनीच्या खिलाडूवृत्तीवर सर्वांनी टीका केली. MS Dhoni हे वागणं बरं नव्हं!; 'कॅप्टन कूल'चा पारा चढला अन् अंपायरने 'तो' निर्णयच बदलला!
आता या वादात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) कर्णधार विराट कोहलीनं उडी मारली. त्यानं कर्णधाराला Wideसाठीही मैदानावरील पंचाकडे रिव्ह्यू मागण्याचा पर्याय दिला गेला पाहिजे, असे सांगितले. त्याशिवाय कंबरेवरील फुल टॉस चेंडूचाही रिव्ह्यू झाला पाहिजे. ''एक कर्णधार म्हणून मी सांगतो की Wide किंवा हाय फुलटॉस तपासण्यासाठी रिव्ह्यू दिला गेला पाहिजे. IPLसारख्या ऐतिहासिक स्पर्धांमध्ये एखादी लहान चूकही महागात पडते. एका धावेनं तुम्ही सामना हरलात आणि तुम्ही त्या एका निर्णयाचा रिव्ह्यू घेऊ शकत नसाल, तर मग त्यानं मोठा फरक पडू शकतो.'' बुधवारी Puma India ने आयोजित केलेल्या इस्टा लाईव्हमध्ये विराटनं हे मत मांडलं.
१००+ मीटर लांब सिक्ससाठी अतिरिक्त धाव द्या- लोकेश राहुलKXIPचा कर्णधार लोकेश राहुलंनी Puma India ने आयोजित केलेल्या इस्टा लाईव्हमध्ये सहभाग घेतला होता. त्यात विराट कोहलीसह त्यानं १०० मीटरपेक्षा लांब सिक्ससाठी अतिरिक्त धाव द्यावी, असा प्रस्ताव ठेवला. फलंदाजांच्या दृष्टीकोनातून ती अतिरिक्त धाव महत्त्वाची ठरेल. या नव्या नियमानं प्रत्येक संघातील खेळाडू षटकारापलीकडे विचार करेल, असेही राहुल म्हणाला.