नवी दिल्ली : अनेक राज्य संघटनांकडून ‘फ्री पासेस’च्या(सन्मानिका) संख्येबद्दल विरोध झाल्यानंतर बीसीसीआयने ही संख्या अर्ध्यावर आणली. प्रशासकांच्या समितीच्या(सीओए) बैठकीत शनिवारी ६०० अतिरिक्त फ्री पासेस यजमान संघटनेला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या पासेस बीसीसीआयच्या वाट्यातून देण्यात येणार असून यावर वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेपासून अंमल करण्यात येईल. नव्या घटनेनुसार स्टेडियमच्या एकूण क्षमतेपैकी ९० टक्के तिकिटे सामान्य नागरिकांसाठी आणि दहा टक्के तिकिटे सन्मानिका म्हणून यजमान संघटनेसाठी ठेवण्यात येतात. याआधी बीसीसीआयकडे स्वत:चे प्रायोजक आणि प्रशासक यांच्यासाठी पाच टक्के तिकिटे असायची. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेने याच कारणास्तव २४ आॅक्टोबर रोजी इंदूरमध्ये वन डे सामना आयोजित करण्यास नकार दिला होता. बंगाल आणि तामिळनाडू संघटनेने देखील अशीच स्थिती राहिल्यास आम्ही यजमानपद भूषविणार नाही, असा इशारा दिला होता.
सीओएने बीसीसीआय आपल्या वाट्याच्या १२०० सन्मानिकांची संख्या घटवीत ती ६०४ वर आणेल, असे सर्व राज्य संघटनांना आश्वासन दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोओएने बीसीसीआयच्या सन्मानिकांची संख्या १२०० वरून ६०४ वर आणल्याचे आणि यजमान संघटनेला अधिक सन्मानिका उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले आहे. (वृत्तसंस्था)
Web Title: After the opposition of state organizations, the number of free passes of BCCI is half
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.