दुष्काळात तेरावा महिना! कर्णधार वॉर्नर, धुलसह दिल्लीच्या खेळाडूंचं लाखोंचं साहित्य गेलं चोरीला

ricky ponting and sourav ganguly ipl : आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाची मालिका सुरूच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:10 PM2023-04-19T12:10:05+5:302023-04-19T12:10:12+5:30

whatsapp join usJoin us
 After playing a match against RCB in IPL 2023, Delhi Capitals players Yash Dhul, Captain David Warner, Mitchell Marsh and Phil Salt have been robbed of lakhs of rupees   | दुष्काळात तेरावा महिना! कर्णधार वॉर्नर, धुलसह दिल्लीच्या खेळाडूंचं लाखोंचं साहित्य गेलं चोरीला

दुष्काळात तेरावा महिना! कर्णधार वॉर्नर, धुलसह दिल्लीच्या खेळाडूंचं लाखोंचं साहित्य गेलं चोरीला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

delhi capitals team | नवी दिल्ली : आयपीएल २०२३ मधील आपले पहिले ५ सामने दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे होते. शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (DC vs RCB) दिल्ली कॅपिटल्सचा दारूण पराभव केला. खरं तर डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नेतृत्वातील दिल्लीचा या स्पर्धेत सलग पाचवा पराभव झाला आहे. २०२० मध्ये आयपीएलचा फायनलचा सामना खेळणारा दिल्लीचा संघ सध्या विजयाच्या शोधात आहे. संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर सातत्याने धावा करत असला तरी त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकिकडे सततचा पराभव सुरू असतानाच एका घटनेने दिल्लीच्या खेळाडूंची डोकेदुखी आणखी वाढली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह इतर काही खेळाडूंचे लाखोंचे साहित्य चोरीला गेल्याने एकच खळबळ माजली. 

दरम्यान, बंगळुरू येथे चिन्नस्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध सामना खेळल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी आपापल्या खोलीत सामान ठेवले होते. संघ दिल्लीला पोहचल्यानंतर खेळाडूंनी आपापले साहित्य तपासले असता त्यांना धक्का बसला. कारण किट आणि किमती बॅगसह लाखो रूपयांचे साहित्य गायब झाले होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या किट बॅगमधून पॅड, शूज, मांडीचे पॅड आणि हातमोजे यांसह 16 बॅट चोरीला गेल्या आहेत. त्यातील 3 बॅट्स डेव्हिड वॉर्नरच्या, 2 मिचेल मार्शच्या, 3 फिल सॉल्टच्या आणि 5 यश धुलच्या आहेत. (David Warner, Mitchell Marsh and Yash Dhull’s bats) दिल्ली कॅपिटल्सच्या फ्रँचायझीने केलेल्या आरोपांनंतर घटनेची अधिक चौकशी केली जात आहे. 

दिल्लीचा सलग पाचवा पराभव
आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दिल्लीचा पाचवा सामना आरसीबीसोबत झाला. खरं तर या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला सलग पाच सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. आरसीबीने २३ धावांनी विजय मिळवून दिल्लीला आणखी एक धक्का दिला. आता दिल्लीचा पुढीला सामना २० एप्रिल रोजी कोलकात नाईट रायडर्सविरूद्ध होणार आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title:  After playing a match against RCB in IPL 2023, Delhi Capitals players Yash Dhul, Captain David Warner, Mitchell Marsh and Phil Salt have been robbed of lakhs of rupees  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.