Join us  

Hardik Pandya सोबत फोटोशूट; कोण आहे ती मिस्ट्री गर्ल? नताशानं बरोबर टायमिंग साधलं, म्हणाली...

स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 8:47 PM

Open in App

Hardik Pandya Natasa Stankovic : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या चर्चेत आहे. ट्वेंटी-२० विश्वचषकात चमकदार कामगिरी करून हार्दिकने टीकाकारांचा चोख प्रत्युत्तर दिले. खरे तर मागील काही कालावधीपासून हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टँकोव्हिच यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याची चर्चा सुरू आहे. अशातच हार्दिकचा आता एका मिस्ट्री गर्लसोबत व्हिडीओ समोर आल्याने एकच चर्चा रंगली. हार्दिकसोबत व्हिडीओत दिसणाऱ्या मुलीला पाहून नेटकऱ्यांनी भलताच तर्क लावला. 

हार्दिक पांड्यासोबत फोटो काढल्यामुळे व्हायरल झालेली मुलगी एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिचे नाम प्राची सोलंकी असे आहे. प्राचीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ५४६के फॉलोअर्स आहेत. प्राची हार्दिकची चाहती असल्याने तिने त्याच्यासोबत फोटोशूट केले. तिने स्वत: हार्दिकसोबतचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. 

दरम्यान, प्राची सोलंकी हार्दिक पांड्यासह त्याचा भाऊ कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुडीसोबत दिसली. पांड्या कुटुंबीयांचे आणि प्राचीचे जवळचे संबंध असल्याचे यावरून स्पष्ट होते. अशातच हार्दिकची पत्नी नताशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत विविध बाबींवर प्रकाश टाकला. 

हार्दिकचा प्राचीसोबतचा व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी भलत्याच प्रतिक्रिया दिल्या. अशातच नताशाने दिलेली प्रतिक्रिया... यामुळे चर्चांना उधाण आल्याचे दिसते. नताशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटले की, मी इथे बसून कॉफी पीत आहे. माझ्या मनात एक विचार आला आणि मी तुमच्याशी शेअर करावे असे वाटले. लोक लोकांबद्दल किती लवकर सर्वकाही ठरवत असतात. त्यांना काहीच वाटत नाही. जर कोणी त्याच्या कॅरेक्टरबाहेर काही करत असेल तर लोक न थांबता काहीही बोलत सुटतात. त्याची परिस्थिती काय होत असेल? याचे त्यांना काहीच वाटत नाही. पण फक्त त्याला न्याय देण्यासाठी किंबहुना जज करण्यासाठी सर्वजण पुढे येतात. त्यामुळे आतापासून असे काहीही न करता कोणाचाही न्यायनिवाडा करण्यापूर्वी संपूर्ण परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचसेलिब्रिटीभारतीय क्रिकेट संघ