नागपूर : रणजी चॅम्पियन विदर्भाने आपला फॉर्म कायम राखला आणि आज इ‘राणी’चा राजा होण्याचा मान मिळवला. शेष भारतविरुद्धची लढत आज रविवारी अखेरच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे अनिर्णीत संपली, पण पहिल्या डावातील आघाडीच्या आधारवर विदर्भाने चषकावर नाव कोरले. विदर्भातर्फे २८६ धावांची खेळी करणारा अनुभवी फलंदाज वसीम जाफर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
विदर्भाने जाफरच्या द्विशतकी खेळीव्यतिरिक्त गणेश सतीश (१२०) व अपूर्व वानखेडे (नाबाद १५७) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पल्यिा डावात ७ बाद ८०० धावांची दमदार मजल मारली होती. प्रत्युत्तरात शेष भारत संघाचा पहिला डाव ३९० धावांत संपुष्टात आला. विदर्भाने पहिल्या डावात ४१० धावांची निर्णायक आघाडी घेतली.
आज पाचव्या दिवशी शेष भारत संघाने कालच्या ६ बाद २३६ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. हनुमा विहारी (१८३) व अष्टपैलू जयंत यादव (९६) यांच्यादरम्यान २१६ धावांची भागादीर झाली, तरी शेष भारत संघाचा पहिला डाव पाचव्या व अखेरच्या दिवशी ३९० धावांत संपुष्टात आला.
शेष भारत संघाच्या डावात हनुमा विहारीची खेळी उल्लेखनीय ठरली. शनिवारी चौथ्या दिवशी ६ बाद ९८ अशी अवस्था असताना विहारी व जयंत यांनी २१६ धावांची भागीदारी केली. डावाच्या १०६ व्या षटकात आदित्य सरवटेने (३-९७) जंयतला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. तो बाद झाल्यानंतर विहारीने शाहबाद नदीमच्या (१५) साथीने ५८ धावांची भागीदारी केली. विहारी बाद होणारा अखेरचा खेळाडू ठरला. त्याला सरवटेने बाद केले. विहारीने ३२७ चेंडूंना सामोरे जाताना २३ चौकार व ३ षटकार लगावले.
विदर्भाने शेष भारत संघाला फॉलोआॅन न देता दुसºया डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी पंचांनी उभय संघाच्या कर्णधारांच्या सहमतीने सामना अनिर्णीत संपविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी विदर्भाने दुसºया डावात बिनबाद ७९ धावा केल्या होत्या. त्यावेळी अक्षय वाडकर ५० व संजय रामास्वामी २७ धावा काढून खेळपट्टीवर होते.
धावफलक
विदर्भ पहिला डाव ७ बाद ८०० (डाव घोषित).
शेष भारत पहिला डाव (कालच्या ६ बाद २३६ धावसंख्येवरुन पुढे ):- विहारी झे. वानखेडे गो. सरवटे १८३, जयंत यादव यष्टिचित वाडकर गो. सरवटे ९६, नदीम त्रि. गो. सरवटे १५, कौल झे. वाठ (बदली खेळाडू) गो. उमेश ०२, सैनी नाबाद ००. अवांतर (२). एकूण १२९.१ षटकांत सर्वबाद ३९०. बाद क्रम : ७-३१४, ८-३७२, ९-३८९, १०-३९०. गोलंदाजी : उमेश २७-७-७२-२, गुरबानी २४-४-७०-४, ठाकरे १९-४-७४-१, सरवटे ३७.१-१२-९७-३, वखरे २१-३-६४-०, रामास्वामी १-०-११-०.