"क्या समझा फायर है मैं...," IPL मध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर सुरेश रैना पहिल्यांदाच आला समोर

काही दिवसांपूर्वीच आयपीएलचं मेगा ऑक्शन पार पडलं. यावेळी सुरेश रैना ला कोणत्याही संघानं आपल्या ताफ्यात घेतलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 10:09 AM2022-03-03T10:09:23+5:302022-03-03T10:09:49+5:30

whatsapp join usJoin us
after remaining unsold in ipl suresh raina came in front for the first time says what do you understand is fire social media | "क्या समझा फायर है मैं...," IPL मध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर सुरेश रैना पहिल्यांदाच आला समोर

"क्या समझा फायर है मैं...," IPL मध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर सुरेश रैना पहिल्यांदाच आला समोर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Suresh Raine IPL : काही दिवसांपूर्वीच आयपीएलचं मेगा ऑक्शन (IPL Mega Auction) पार पडलं. यावेळी सुरेश रैना (Suresh Raina) याला कोणत्याही संघानं आपल्या ताफ्यात घेतलं नाही. ही सर्वांनाच आश्चर्य चकित करणारी बाब होती. रैनाची बेस प्राईज २ कोटी रूपये होती. जेव्हा त्याचं नाव घेतलं गेलं, तेव्हा कोणत्याही संघानं त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रस दाखवला नाही. यानंतर त्याच्या सर्व चाहत्यांनाही धक्का बसला.

यानंतर सुरेश रैनासोशल मीडियावर ट्रेंड झाला होता. परंतु सुरैश रैनानं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता काही दिवसांनी मिस्टर आयपीएलनं आपल्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला त्याच्या चाहत्यांचीही पसंतीही मिळाली आहे. फायर (इमोजी) है मैं... तुम्हाला माहितीये हे काय आहे.. असं कॅप्शन त्यानं आपल्या फोटोला दिलं आहे.


रैना यामध्ये पुष्पा चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध झालेली अॅक्शन करताना दिसत आहे. तसंच 'झुकेगा नहीं' असा संदेशही त्यानं यातून दिलेला दिसत आहे. आयपीएल रिटेंशनमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं त्याला रिटेन केलं नव्हतं. यानंतर कोणत्याही फ्रेन्चायझीनं त्याला खरेदी केलं नव्हंत. यानंतर चेन्नई सुपरकिंग्सवर त्याच्या फॅन्सनं संताप व्यक्त केला होता.

Web Title: after remaining unsold in ipl suresh raina came in front for the first time says what do you understand is fire social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.