भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक असलेला MS Dhoni आता मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. धोनीनं 2019मध्ये स्वतःचा Dhoni Entertainment बॅनर लाँच केला होता आणि त्याखाली त्यानं 'Roar of the Lion' ही पहिली डॉक्युमेंट्री तयार केली होती. आगामी वर्षात तो आणखी अशा डॉक्युमेंट्रींना प्रोड्युस करताना दिसणार आहे.
धोनीची पत्नी साक्षी ही या प्रोडक्शन हाऊसची मॅनेजिंग डायरेक्टर आहे. ती म्हणाली,''नवीन लेखकांच्या प्रसिद्ध न झालेल्या पुस्तकांचे हक्क आम्ही घेतले आहेत. त्यांचे आम्ही वेब-सीरिजमध्ये रुपांतर करणार आहोत. या पौराणिक कथा असणार आहेत.'' त्यांचे दिग्दर्शन कोण करेल, याची निवड लवकरच केली जाईल. क्रिकेट हे धोनीचं पहिलं प्रेम आहे, परंतु धोनी आणि साक्षी आता प्रोडक्शन हाऊसमध्ये काम पाहणार आहेत.
''जेव्हा आम्ही Roar of the Lion डॉक्युमेंट्रीवर काम करत होतो, तेव्हाच मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकण्याची हीच योग्य वेळ असल्याचा आम्ही विचार केला. आम्ही नव्या, उदयोन्मुख चेहऱ्यांना संधी देण्याचे ध्येय ठेवले आहे आणि तेही ओरिजिनल कंटेन्टसोबत. माही प्रोडक्शन हाऊसमध्ये पूर्णवेळ लक्ष देणार नाही. लोकांना क्वालिटी कंटेन्ट मिळेल, याची आम्ही काळजी घेणार आहोत. माही आणि माझा निर्णय अंतिम असेल. लोकांना मनाला भिडतील अशा कथा आम्हाला सादर करायच्या आहेत,''असेही साक्षीनं सांगितलं.
धोनी सध्या Indian Premier League ( IPL 2020) साठी UAEत आहे. चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) सुरुवात फार चांगली झालेली नाही. तीन सामन्यांत त्यांना सलग दोन पराभव पत्करावे लागले आहेत. धोनीनं 90 कसोटी सामन्यांत 38.09 च्या सरासरीनं 6 शतकं व 33 अर्धशतकांसह 4876 धावा केल्या आहेत. 350 वन डे क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ही 50.57 इतकी आहे. त्याच्या 10773 धावांत 10 शतकं व 73 अर्धशतकांचा समावेश आहे. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 98 सामन्यांत 1617 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षणात कसोटीत त्याच्या नावावर 256 झेल व 38 स्टम्पिंग, वन डेत 321 झेल व 123 स्टम्पिंग आणि ट्वेंटी-20त 57 झेल व 34 स्टम्पिंग आहेत.
Web Title: After retiring from international cricket, MS Dhoni sets his eyes on showbiz industry
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.