मुंबई : आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीसाठी चाहते काहीही करायला तयार असतात. अशीच एक गोष्ट क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाली. एक चाहता आपला जीव धोक्यात घालून मैदानात शिरला आणि थेट भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या दिशेने धावत सुटला. त्यानंतर जे काही घडले, ते पाहण्यासारखे होते.
भारताने इंदूर येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला. भारताने बांगलादेशला तब्बल एक डाव आणि १३० धावांनी पराभूत केले. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात एक रंजकदार गोष्ट पाहायला मिळाली. एका चाहत्याने आपल्या अंगावर विराटचे नाव लिहिले होते. अचानक हा चाहता आपल्या आसनावरून उठला. समोर असलेली मोठी जाळी त्याने ओलांडली. ही जाळी ओलांडत असताना तो पडणार होता, पण थोडक्यात वाचला. जर तो पडला असता तर त्याला नक्कीच बर मार बसला असता आणि त्याच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकला असता.
जाळीवरून उडी मारून हा चाहता थेट मैदानात पोहोचला. मैदानात भारतीय संघ एकत्रितपणे उभा होता. हा चाहता धावत भारतीय संघावर पोहोचला. तिथे उभ्या असलेल्या कोहलीला तो भेटला. त्यावेळीच काही सुरक्षा रक्षकांनी मैदानात धाव घेतली आणि त्या चाहत्याची धरपकड करायला त्यांनी सुरुवात केली. यावेळी कोहलीने या सुरक्षा रक्षकांना थांबवले आणि त्या चाहत्याला शांतपणे घेऊन जाण्यास सांगितले.
इशांतने प्रश्न विचारल्यावर शमीने उलगडले रहस्य; जाणून घ्या काय आहे सत्य...मुंबई : भारत विरुद्ध बांगालादेश यांच्यामधील पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीचा वेगवान मारा पाहायला मिळाला. शमीला यावेळी उमेश यादव आणि इशांत शर्मा या दोन्ही वेगवान गोलंदाजांनी सुरेख साथ दिली. पण या दोघांपेक्षा शमीची गोलंदाजी उजवी असल्याचे पाहायला मिळाले.
शमीने या कसोटी सामन्यात पहिल्या डावात तीन आणि दुसऱ्या डावात चार बळी मिळवले. दुसऱ्या डावात तर शमीचे चेंडू बांगलादेशच्या फलंदाजांना खेळताही येत नव्हते. दुसऱ्या डावात शमी हा आग ओकत असल्याचेही काही चाहत्यांनी म्हटले होते.
पहिला कसोटी सामना संपल्यावर समालोचक हर्षा भोगले यांनी शमी, इशांत आणि उमेश या तिघांची एकत्रितपणे मुलाखत घेतली. यावेळी इशांतने शमीला एक प्रश्न विचारला. इशांतने शमीला विचारले की, तू एवढा भेदक मारा कसा करू शकतोस? यावर शमी म्हणाला की, " कर्णधार आणि प्रशिक्षकांनी मला मोकळीक दिली आहे. त्याचबरोबर मला तुमच्यासारखे चांगली सहकारी मिळाले आहेत. त्यामुळेच माझी गोलंदाजी चांगली होत आहे."
शमी आणि मयांकची क्रमवारीत झेप; पटकावले मानाचे स्थानभारत विरुद्ध बांगालादेश यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अगरवाल आणि मोहम्मद शमी यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. या कागिरीचा फायदा या दोघांनाही आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत झालेला पाहायला मिळाला.
मयांककने या सामन्यात द्विशतकी खेळी साकारली, तर शमीने सामन्यात सात विकेट्स मिळवल्या. या कामगिरीच्या जोरावर या दोघांनी आयसीसीच्या क्रमवारीत झेप घेतली आहे. शमीने तर माजी कर्णधार कपिल देव आणि जसप्रीत बुमरा यांच्यानंतर मानाचे स्थान पटकावले आहे.
कसोटी सामन्यात २४३ धावांची खेळी साकारत मयांकने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीमुळे मयांकने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अकरावे स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा माी कर्णधार स्टीव्हन स्मिथ अव्वल स्थानावर आहे, तर दुसरे स्थान भारताचा कर्णधार कोहलीने पटकावले आहे.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीमध्ये शमीने सातवे स्थान पटकावले आहे. कपिल देव आणि बुमरा यांच्यानंतर शमी हा हे स्थान पटकावणारा भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.