Riyan Parag: "त्याला लवकर भारतीय संघात घ्या", रियान परागने 28 चेंडूत 78 धावा केल्यानंतर चाहत्यांची मागणी  

Ranji Trophy 2022: रियान परागने वादळी खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 12:00 PM2022-12-29T12:00:26+5:302022-12-29T12:03:50+5:30

whatsapp join usJoin us
After Riyan Parag's 28-ball 78 in the Ranji Trophy, fans have been clamoring to give him a chance in the Indian team | Riyan Parag: "त्याला लवकर भारतीय संघात घ्या", रियान परागने 28 चेंडूत 78 धावा केल्यानंतर चाहत्यांची मागणी  

Riyan Parag: "त्याला लवकर भारतीय संघात घ्या", रियान परागने 28 चेंडूत 78 धावा केल्यानंतर चाहत्यांची मागणी  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारताचा युवा क्रिकेटर रियान पराग सध्या चांगलाच चर्चेत आहे. माजी अंडर-19 विश्वचषक विजेत्याने यापूर्वी सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफी सामन्यांमध्ये आपल्या शानदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. अशातच सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये देखील रियानने आपली छाप सोडली आहे. सध्या चालू हंगामात आसामचा दुसरा सामना हैदराबादविरुद्ध खेळवला जात आहे. ज्यात रियान परागने वादळी खेळी करून अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. आसामचा संघ धावा करण्यासाठी संघर्ष करत असताना रियागने उल्लेखणीय खेळी केली. 

परागने हैदराबादच्या गोलंदाजांचा घेतला समाचार 
28 डिसेंबर रोजी हैदराबाद आणि आसाम यांच्यातील बुधवारी सामन्याचा दुसरा दिवस होता. प्रथम फलंदाजी करताना आसामने पहिल्या डावात 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने 208 धावांसह 3 धावांची आघाडी घेतली. त्याला प्रत्युत्तर देताना आसामची स्थिती देखील बिकट झाली. रियान परागने ताबडतोब खेळी केल्यानंतर चाहत्यांनी त्याला भारतीय संघात संधी देण्याची मागणी केली आहे. 

6 षटकार आणि 8 चौकार
सलग पडणाऱ्या बळीमुळे आसाम सामन्यात बॅकफूटवर जात असल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, यानंतर रियान परागने तुफानी फलंदाजी केली की सगळ्यांचे लक्ष वेधले. अवघ्या 28 चेंडूंचा सामना करत त्याने 78 धावांची खेळी केली. ज्यात 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता, त्याच्या खेळीमुळे आसामच्या संघाने डावात पुनरागमन केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: After Riyan Parag's 28-ball 78 in the Ranji Trophy, fans have been clamoring to give him a chance in the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.