smriti mandhana rcb | मुंबई : महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. या लिलावात एकूण 5 फ्रँचायझी रिंगणात असून 409 खेळाडूंवर बोली लावली जात आहे. BCCI ने WPL 2023च्या लिलावासाठी 409 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यासाठी एकूण 1525 खेळाडूंनी नोंदणी केली होती. महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 4 ते 26 मार्च दरम्यान पार पडणार आहे. स्मृती मानधनाला आरसीबीच्या फ्रँचायझीने विक्रमी बोली लावून खरेदी केल्यानंतर तिने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "नमस्कार बंगळुरू", अशा शब्दांत स्मृतीने आपला आनंद व्यक्त केला.
दरम्यान, लिलावात प्रत्येक फ्रँचायझी खेळाडूंवर 12 कोटी रूपये खर्च करू शकते. किमान 15 आणि जास्तीत जास्त 18 खेळाडूंना खरेदी करण्याची मुभा आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्स आणि रेणुका सिंग 50 लाख रूपयांच्या मूळ किमतीसह लिलावाच्या रिंगणात होत्या. लक्षणीय बाब म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीने मराठमोळ्या स्मृती मानधनाला 3.40 कोटी रूपयांमध्ये खरेदी केले. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबईच्या फ्रँचायझीने 1.8 कोटी रूपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले.
आरसीबीच्या फ्रँचायझीने आतापर्यंत खरेदी केलेले खेळाडू
- स्मृती मानधना - 3.40 कोटी
- सोफी डिव्हाईन - 50 लाख
- एलीसी पेरी - 1.70 कोटी
- रेणुका सिंग - 1.5 कोटी
स्मृती मानधनाची पहिली प्रतिक्रिया
- -WPL च्या लिलावात केवळ 90 खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
- - प्रत्येक संघाला 18 खेळाडूंचीच निवड करता येणार आहे, 150 खेळाडूंचा एक संच असणार आहे.
- -50, 40 व 20 लाख अशा तीन बेस प्राईज ( मुळ किंमत) ठेवण्यात आल्या आहेत. अनकॅप्ड खेळाडूसाठी 10 ते 20 लाखांची बेस प्राईज ठेवली जाईल.
- -लिलावासाठी एकूण 1525 खेळाडूंनी नोंदणी केली होती आणि त्यापैकी 409 खेळाडूंची निवड केली गेली.
- - यामध्ये 246 भारतीय आणि 163 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे, ज्यात संलग्न संघटनेचे 8 खेळाडूही आहेत.
RCB ताफ्यात आल्यावर आनंद गगनात मावेना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"