देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट धोकादायक असल्याचा अहवाल एसबीआयनं नुकताच दिला आहे. या दुसऱ्या लाटेत अनेक अभिनेते, दिग्गज नेते यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. आता युसुफ पठाणलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. युसुफ पठाणनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याची माहिती दिली. तसंच त्यांनं आपल्या संपर्कात आलेल्यांनी लवकरात लवकर आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यानं केलं आहे. काही दिवसांपूर्वीच रोड सेफ्टी ही क्रिकेट सीरिज पार पडली. यावेळी सचिन तेंडुलकर, युसुफ पठाण, युवराज सिंग, इरफान पठाण यांच्यासारखे दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षण आढळून आली आहेत. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं आहे. तसंच आवश्यक ती काळजी आणि औषधोपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांत जे लोकं माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपली कोरोना चाचणी करून घ्यावी," असं आवाह युसुफ पठाण यानं केलं आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- सचिन तेंडुलकर पाठोपाठ युसुफ पठाणलाही कोरोनाची लागण
सचिन तेंडुलकर पाठोपाठ युसुफ पठाणलाही कोरोनाची लागण
Yusuf Pathan : संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं युसुफ पठाणनं केलं आवाहन. दोघंही नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेत झाले होते सहभागी.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 9:34 PM
ठळक मुद्दे संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं युसुफ पठाणनं केलं आवाहन.दोघंही नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेत झाले होते सहभागी.