नवी दिल्ली : कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज करुण नायर सध्या भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी झगडत आहे. त्या एका विक्रमी खेळाने स्टार बनलेल्या करुणला यानंतर भारताच्या संघात स्थान मिळाले नाही. ‘गेल्या एक वर्षात मला खूप शिकायला मिळाले असून आधी मी उंच भरारी घेतली आणि त्यानंतर जमिनीवर आपटलो,’ अशी प्रतिक्रिया करुणने दिली.
करुणला त्रिशतक झळकावल्यानंतर जीवनात काय बदल घडले, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने म्हटले की, ‘गतवर्षाने मला चांगलाच धडा शिकवला आहे. सुरुवातीला मी त्रिशतकाच्या जोरावर उंच भरारी घेतली आणि त्याच वेगाने खाली आपटलो. भावनिकरीत्या कशा प्रकारे स्थिर राहावे हे मी गेल्या वर्षात शिकलो. जेव्हा तुम्ही अव्वल स्थानी असता, तेव्हा फार उंच उडू शकत नाही. कारण, कोणत्याही क्षणी खाली पडू शकता. आपल्याला सर्वसामान्य राहावे लागते. एका वर्षातच या अनुभवाने मला सर्व शिकवले.’
निराशाजनक फॉर्मविषयी करुण म्हणाला की, ‘तो काळ खूप निराश करणारा होता. मी चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीमध्ये साकार करण्यात अपयशी ठरत होतो. यामुळे मला नैराश्याने गाठले आणि त्यातून बाहेर पडायला मला खूप कठीण जात होते. मी शांतपणे विचार केला की, मी हा खेळ का निवडला? वेगळा विचार केल्यानंतर फायदा झाला.’ (वृत्तसंस्था)
कर्नाटककडून खेळताना करुणने गेल्या दहा सामन्यांतून
352
धावा फटकावल्या असून यामध्ये २ शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. मधल्या फळीत फलंदाजी करणाºया करुणला सध्या भारतीय संघात स्थान मिळविणे कठीण आहे.
2016 डिसेंबर मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात त्रिशतक ठोकल्यानंतर डिसेंबर २०१७पर्यंत तो भारताच्या कसोटी, एकदिवसीय किंवा टी२० संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत नव्हता. त्रिशतक झळकावल्यानंतर भारताच्या कोणत्याही संघातून त्याला खेळण्याची संधीच मिळाली नाही.विशेष म्हणजे चेन्नई येथे डिसेंबर २०१६मध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात शिखर धवन जखमी झाल्याने करुणला संघात स्थान मिळाले होते. करुणने त्याचवेळी त्रिशतक ठोकत निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविला.
करुणचा विक्रम
इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावून करुणने अनेक विक्रम रचले. पहिल्या कसोटी शतकाचा त्रिशतकामध्ये रूपांतर करणारा करुण जगातील केवळ तिसरा फलंदाज ठरला. त्याच्याआधी अशी कामगिरी वेस्ट इंडिजच्या सर गारफील्ड सोबर्स (३६५*) आणि आॅस्टेÑलियाच्या बॉब सिम्पसन (३११) यांनी केली होती. तसेच करुणने या वेळी सचिन तेंडुलकर (२४८*), व्हीव्हीएस लक्ष्मण (२८१) आणि राहुल द्रविड (२७०) यांचा वैयक्तिक सर्वोच्च धावांचा विक्रमही मोडला होता.
Web Title: After taking a high lap, stir up the ground
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.