rohit sharma on team india : ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांचं मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन झालं आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संघ निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विविध बांबीवर भाष्य केलं. रोहितनं संघाची रणनीती सांगताना काही कोपरखळ्या देखील मारल्या. संघात चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरून पेच असताना रोहितनं पत्रकारांच्या प्रश्नाला भन्नाट उत्तर दिलं.
रोहित म्हणाला की, सलामीवीरांची जी जागा आहे ते तिथेच खेळतील. तीन नंबरचा फलंदाज इथं खेळेल. पाचव्या क्रमांकावर लोकेश राहुल खेळेल, सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या आणि सातव्या स्थानावर रवींद्र जडेजा असेल. नंबर चार आणि पाच वर खाली झालं तर काही प्रॉब्लेम नाही. आम्ही जेव्हा संघात आलो होतो तेव्हा आम्ही देखील कुठेही फलंदाजी केली आहे. असं नाही की सलामीवीराला आठव्या क्रमांकावर खेळवा आणि आठव्या क्रमाकांच्या खेळाडूला सलामीवीर म्हणून पाठवा. आम्ही ही 'पागलपंती' करत नाही. रोहितच्या या उत्तरानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
रोहितच्या उत्तरानं पिकला हशा
दरम्यान, युझवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन आणि शिखर धवन यांना आगामी स्पर्धेत स्थान मिळालं नाही. शिखर धवनला वगळल्यानंतर अजित आगरकर यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला. "शिखर धवन हा भारतासाठी उत्कृष्ट ठरला आहे. पण, आताच्या घडीला रोहित शर्मा, शुबमन गिल आणि इशान किशन हे आमचे तीन पसंतीचे सलामीवीर आहेत", असे आगरकर यांनी स्पष्ट केलं.
आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा,
राखीव खेळाडू - संजू सॅमसन
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल