Join us  

पराभवानंतर रोहित-कोहलीला अश्रू अनावर, इंग्लंडच्या फलंदाजांनी केली धुलाई

रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली या दोघांनाही अश्रू अनावर झाले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 6:17 AM

Open in App

ॲडलेड :

सलामीला पाकिस्तानला नमवून दिमाखदार सुरुवात केलेल्या भारतीय संघाला यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध अत्यंत निराशाजनक पराभवासह स्पर्धेबाहेर पडावे लागले. यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा तर झालीच, मात्र कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली या दोघांनाही अश्रू अनावर झाले. 

गुरुवारी उपांत्य लढतीत इंग्लंडने भारताला १० गड्यांनी नमवले. ज्या मैदानावर दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या १६४ असताना भारताने ४ धावा अधिक काढल्या. मात्र तरीही या धावा पुरेशा ठरल्या नाहीत. त्यातही इंग्लंडचा एकही बळी न घेता आल्याची स्पष्ट निराशा रोहित लपवू शकला नाही. क्रिकेटविश्वाला भारत - पाक या हायव्होल्टेज ‘फायनल’ची स्वप्ने पडली असताना, इंग्लंडने आपल्या दणकेबाज खेळाने सर्वांनाच खडबडून जागे केले.  

पराभव स्वीकारणे कठीणजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारतासाठी अंतिम फेरीचा मार्ग सोपा मानला जात होता, पण घडले भलतेच. या पराभवानंतर एकीकडे रोहितला अश्रू अनावर झाले आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही त्याला धीर दिला, तर दुसरीकडे कोहलीला अलिंगन देत हार्दिक पांड्याने त्याचे सांत्वन केले. भारतीय चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. सर्वांनाच हा पराभव स्वीकारणे कठीण झाले.

भारतीय खेळाडूंना देशाबाहेरच्या परिस्थितीची चांगल्या प्रकारे माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली पाहिजे. पण, हा निर्णय पूर्णपणे बीसीसीआयवर अवलंबून आहे. - राहुल द्रविड, प्रशिक्षक - भारत

एकटा कोहली भिडला- यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी खराब फॉर्ममुळे विराट कोहलीवर बरीच टीका झाली. - मात्र, आशिया चषक स्पर्धेत झळकावलेल्या शतकानंतर कोहलीने आपला दर्जा दाखवला आणि टी-२० विश्वचषकात तब्बल ४ अर्धशतके ठोकली. - पाकविरुद्ध त्याने लाजवाब फलंदाजी करत स्तर दाखवून दिला. सूर्यकुमार यादवचा अपवादवगळता कोहलीला स्पर्धेत इतर प्रमुख फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२रोहित शर्माविराट कोहली
Open in App