कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) प्ले ऑफ गाठण्याच्या आशा कायम राखताना चेन्नई सुपरकिंग्जला ६ गड्यांनी नमवले. चेन्नईला २० षटकांत ६ बाद १४४ धावांवर रोखल्यानंतर कोलकाताने १८.३ षटकांत ४ बाद १४७ धावा केल्या. कर्णधार नितिश राणा आणि रिंकू सिंग यांची अर्धशतकी खेळी कोलकातासाठी मोलाची ठरली.
लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची पाचव्या षटकात ३ बाद ३३ धावा अशी अवस्था झाली. येथून कर्णधार नितिश राणा आणि यंदाचे आयपीएल गाजवलेल्या रिंकू सिंग यांनी संघाला विजयी मार्गावर आणत चौथ्या गड्यासाठी ७६ चेंडूंत ९९ धावांची निर्णायक भागीदारी केली. रिंकूने ४३ चेंडूंत ४ चौकार व ३ षट्कारांसह ५४ धावा फटकावल्या. नितिशने ४४ चेंडूंत ६ चौकार व एका षट्कारांसह नाबाद ५७ धावा केल्या. १८व्या षटकात रिंकू धावबाद झाला. यानंतर नितिशने आंद्रे रसेलसोबत (२*) संघाच्या विजयात शिक्का मारला.
MS धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार?, चेन्नईत खेळला शेवटचा सामना; जाणून घ्या हे ३ संकेत
सामना संपल्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पराभवाचे कारण सांगितले. दुसऱ्या डावात आम्ही पहिला चेंडू टाकला, तेव्हा आम्हाला १८० धावांची गरज होती हे कळले. मात्र, या विकेटमध्ये आम्ही कोणत्याही परिस्थितीत १८० धावा करू शकलो नाही. दवबिंदूचा दुसऱ्या डावात मोठा फरक केला. आम्ही आमच्या कोणत्याही गोलंदाजाला दोष देऊ शकत नाही, असं धोनीने सांगितले. पराभवानंतरही धोनीने संघातील शिवम दुबे आणि दीपक चहर या दोन खेळाडूंचे कौतुक केले. आजच्या सामन्यात शिवमने जे केले त्यामुळे मी खूप खूश आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो समाधानी राहत नाही आणि सतत सुधारणा करत राहतो, असं धोनी म्हणाला.
दरम्यान, कोलकाताने दमदार गोलंदाजी करताना चेन्नईला जखडवून ठेवले. वरुण चक्रवर्थी आणि सुनील नरेन यांनी चेन्नईला मोक्याच्या वेळी जबर धक्के दिले. परंतु, शिवम दुबेच्या झुंजार फटकेबाजीमुळे चेन्नईने समाधानकारक मजल मारली. प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर दुबेने ३४ चेंडूंत नाबाद ४८ धावा फटकावताना १ चौकार व ३ षट्का मारले. त्याने रवींद्र जडेजासोबत सहाव्या गड्यासाठी ५३ चेंडूंत ६८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला पुनरागमन करून दिले जडेजाने २४ चेंडूंत एका षट्कारासह २० धावा केल्या. डीवोन कॉन्वेने २८ चेंडूंत ३ चौकारांसह ३० धावा केल्या चेन्नईचा ७२ धावांवर अर्धा संघ गमावला होता.
Web Title: After the match Mahendra Singh Dhoni explained the reason behind the defeat against Kolkata.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.