Chetan Sharma BCCI: "अखेर तो दिवस आलाच...", चेतन शर्मांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

chetan sharma news: चेतन शर्मा यांनी 'स्टिंग ऑपरेशन'नंतर 17 फेब्रुवारीला आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 05:05 PM2023-02-17T17:05:36+5:302023-02-17T17:06:22+5:30

whatsapp join usJoin us
After the resignation of BCCI Chief Selector Chetan Sharma, funny memes are going viral on social media    | Chetan Sharma BCCI: "अखेर तो दिवस आलाच...", चेतन शर्मांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Chetan Sharma BCCI: "अखेर तो दिवस आलाच...", चेतन शर्मांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

chetan sharma memes | मुंबई : बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशननंतर शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडे पाठवला होता, जो मंजूर करण्यात आला आहे. 40 दिवसांपूर्वी 7 जानेवारी 2023 रोजी ते पुन्हा एकदा मुख्य निवडकर्त्याच्या खुर्चीवर बसले होते. मुख्य निवडकर्ता पदावरून पायउतार झाल्यानंतर चेतन शर्मा यांच्याविरूद्ध सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर चेतन शर्मा यांना ट्रोल केले जात आहे. एका युजरने ट्विटरवर मीम शेअर करत म्हटले की, "हे असं होणार हे माहितीच होते, पण एवढ्या लवकर होईल असे वाटले नव्हते." तर एका युजरने गांगुली आणि चेतन शर्मा यांचे युग संपले असल्याचे म्हटले आहे. 

चेतन शर्मा यांची धक्कादायक वक्तव्ये...

  • खेळाडू 80 ते 85 टक्के फिट झाल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी इंजेक्शन घेतात.
  • जसप्रीत बुमराहचे सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून पुनरागमन करण्यावरून संघ व्यवस्थापनाशी मतभेद होते. बुमराहला अजूनही संघात संधी मिळालेली नाही.
  • विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात भांडण झाले होते. गांगुलीमुळे विराटला कर्णधारपद गमवावे लागले.
  • इशान किशन याच्या द्विशतकी खेळीमुळे संजू सॅमसन सारख्यांना संघात स्थान नाही. संघातून स्थान गमावण्याच्या भीतीपोटी इंजेक्शनचा वापर करीत खेळाडू स्वत:ला फिट ठेवतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: After the resignation of BCCI Chief Selector Chetan Sharma, funny memes are going viral on social media   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.