नवी दिल्ली : उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत ही दोन नावं सध्या खूप चर्चेत आहेत. उर्वशी आणि पंत यांच्याबद्दल विविध प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा या दोघांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. खरं तर बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सध्या टी-20 विश्वचषकाचा आनंद घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. अलीकडेच उर्वशी रौतेलाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती कोणाला तरी आय लव्ह यू म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून क्रिकेटचे चाहते म्हणू लागले की, कदाचित तिने ऋषभ पंतलाच आय लव्ह यू असे म्हटले आहे. आता खुद्द अभिनेत्री याबाबत खुलासा केला आहे.
सोशल मीडियावर उर्वशीच्या प्रेमप्रकरणाची अफवा पसरताच तिने इस्टाग्रामवर स्टोरी टाकून याला पूर्णविराम दिला आहे. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर उर्वशीने स्पष्ट केले की, "मला माझ्या आय लव्ह यू व्हिडीओबद्दल पुन्हा स्पष्ट करायचे आहे. जे सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे, तो व्हिडीओ केवळ अभिनयाच्या दृष्टिकोनातून आणि एखाद्याने दिग्दर्शित केलेला संवाद सीन होता." खरं तर उर्वशीने काही दिवसांपूर्वी एक रोमॅंटिक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहले होते की, "समझो..." या व्हिडीओवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
चाहत्यांनी साधला निशाणा उर्वशीच्या या व्हिडीओमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलर्सचा सामना करावा लागला. आता स्टोरी टाकल्यानंतर पुन्हा एकदा ती टोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. या व्हिडीओत ती म्हणते की, "आप बोलो आई लव यू ... नहीं पहले आप बोलो आई लव यू.. एक बार बोल दो... बस एक बार बोल दो", त्यामुळे तिच्यावर चाहत्यांनी निशाणा साधला आहे.
उर्वशी-पंत ऑगस्टपासून नॉट आउट लक्षणीय बाब म्हणजे ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यातील वाद या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाला. उर्वशीने एका एंटरटेनमेंट पोर्टलला मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने मिस्टर आरपीचे नाव घेतले. उर्वशी म्हणाली होती की "मिस्टर आरपी" तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये जवळपास 10 तास तिची वाट पाहत होता, परंतु त्या वेळी ती झोपली होती आणि त्यामुळे त्याला एवढी वेळ वाट पाहावी लागली होती. त्यामुळे ऑगस्टमध्ये सुरू झालेले हे प्रकरण आजतागायत सुरूच आहे. खरं तर उर्वशी अनेकवेळा क्रिकेटच्या मैदानावर दिसली आहे. अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला देखील तिने हजेरी लावली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"