Arshdeep Singh Trolled: "तू शेर है और रहेगा..." अर्शदीप सिंगसाठी दिग्गज क्रिकेटपटूंसह राजकीय मंडळी मैदानात

यूएईच्या धरतीवर सुरू असलेली आशिया चषकाची स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहचली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 07:06 PM2022-09-05T19:06:04+5:302022-09-05T19:08:39+5:30

whatsapp join usJoin us
After trolling Arshdeep Singh, the political leaders along with many legendary cricketers have come out in support of him  | Arshdeep Singh Trolled: "तू शेर है और रहेगा..." अर्शदीप सिंगसाठी दिग्गज क्रिकेटपटूंसह राजकीय मंडळी मैदानात

Arshdeep Singh Trolled: "तू शेर है और रहेगा..." अर्शदीप सिंगसाठी दिग्गज क्रिकेटपटूंसह राजकीय मंडळी मैदानात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs PAK Asia Cup 2022 । नवी दिल्ली : सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. ही बहुचर्चित स्पर्धा मुख्य टप्प्यावर आली असतानाच भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या (IND vs PAK) सामन्यात पाकिस्तानने 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. भारतीय संघाने जोरदार कमबॅक करून सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला मात्र विजय मिळवण्यात अपयश आले. शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असताना पाकिस्तानने 1 चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला. मात्र भारतीय संघाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) आसिफ अलीचा झेल सोडला त्यामुळे त्याला टीकाकारांचा सामना करावा लागत आहे. 

दरम्यान, भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या आसिफ अलीचा झेल सोडला. अर्शदीपने सोडलेल्या झेलमुळेच भारताचा पराभव झाला असल्याचा सूर चाहत्यांमध्ये आहे. पाकिस्तानी संघाची धावसंख्या 4 बाद 151 असताना आसिफने हवेत फटकार मारला मात्र अर्शदीपला झेल घेण्यात अपयश आले. आसिफने 8 चेंडूंत 16 धावांची महत्त्वाची खेळी केली, ज्यामध्ये 2 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. 

दिग्गजांनी केले अर्शदीपचे समर्थन
23 वर्षीय अर्शदीप सिंग सोशल मीडियावर खूप ट्रोल होत असतानाच त्याच्या समर्थनात अनेक खेळाडूही समोर आले आहेत. या सामन्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीही त्याच्यावर बोलला. माजी क्रिकेटर आकाश चोप्राने अर्शदीपचा प्रोफाईल फोटो लावून त्याचे समर्थन केले आहे. माजी अनुभवी फिरकीपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांनीही अर्शदीपला पाठिंबा दर्शवला आहे. 

17 व्या षटकात सुटला होता झेल
भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की चर्चेला उधान येत असते. मात्र रविवारी झालेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्याच्या 17 व्या षटकात अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या आसिफ अलीचा सोप्पा झेल सोडल्याने त्याच्यावर पातळी सोडून टीका केली जात आहे. आसिफ अलीने झेल सुटल्याचा फायदा घेत चौकार आणि षटकार मारला. त्यामुळे नेटकऱ्यांनी अर्शदीप सिंगवर निशाणा साधण्यास सुरूवात केली. 

 

Web Title: After trolling Arshdeep Singh, the political leaders along with many legendary cricketers have come out in support of him 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.