Join us  

उमरान मलिकचं 'टेन्शन' वाढलं! काश्मीरमध्ये घडतोय आणखी एक 'वेगाचा बादशाह'

२३ डिसेंबर रोजी आयपीएलचा मिनी लिलाव होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 12:49 PM

Open in App

नवी दिल्ली : मागील काही वर्षांपासून जम्मू-काश्मीर आणि क्रिकेटचे जवळचे नाते राते राहिले आहे. उमरान मलिक आणि अब्दुल समद यांच्या उदयामुळे जम्मू-काश्मीरने क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे. जम्मू-काश्मीरमधील फिरकीपटू परवेझ रसूलनेही आयपीएल आणि इतर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये आपली छाप सोडली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधून आणखी एक युवा वेगवान गोलंदाज समोर येण्याच्या मार्गावर आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये २२ वर्षीय वसीम बशीर आपल्या गोलंदाजीच्या वेगाने फलंदाजांना चितपट करत आहे. 

काश्मीरमध्ये घडतोय आणखी एक 'वेगाचा बादशाहउजव्या हाताचा वेगवान गोलंदाज वसीम बशीर त्याच्या अतिरिक्त वेगाने फलंदाजांना घाम फोडताना दिसत आहे. खासकरून गोलंदाजाने शॉर्ट ऑफ लेन्थ बॉल्सना सीमिंग करताना फलंदाजांच्या अडचणीत वाढ केली. वसीम बशीरशी संबंधित व्हिडीओ एका युजरने ट्विटरवर शेअर केली. "काश्मीरचा आगामी काळातील १५० किमी प्रतिताशी वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज. जम्मू-काश्मीरमध्ये उमरान मलिक मोठ्या संख्येने आहेत का? होय हा काश्मीरचा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज वसीम बशीर आहे, जो कदाचित १४५ किमी प्रतितास (१५० किमीहून अधिक) वेगाने गोलंदाजी करू शकतो", अशी माहिती संबंधित युजरने कॅप्शनमध्ये दिली. 

२३ डिसेंबरला होणार आयपीएलचा लिलावबशीरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे त्याला फायदा होण्याची शक्यता आहे. आता आयपीएल लिलावात त्याचे नाव येणार की नाही हे पाहण्याजोगे असेल. कारण आयपीएलमधील संघ त्यांच्या सेटअपमध्ये एक्स्प्रेस स्पीडस्टर्स ठेवण्यास उत्सुक आहेत. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएल २०२३ चा मिनी लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :आयपीएल लिलावआयपीएल २०२२जम्मू-काश्मीरभारतीय क्रिकेट संघ
Open in App