Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने दिवाळीच्या दिल्या 'विराट' शुभेच्छा; चाहत्यांनी पंतचा दाखला देत उडवली खिल्ली

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 04:04 PM2022-10-24T16:04:21+5:302022-10-24T16:09:03+5:30

whatsapp join usJoin us
After Urvashi Rautela give 'Virat' wishes on Diwali, fans mock her on Rishabh Pant    | Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने दिवाळीच्या दिल्या 'विराट' शुभेच्छा; चाहत्यांनी पंतचा दाखला देत उडवली खिल्ली

Urvashi Rautela: उर्वशी रौतेलाने दिवाळीच्या दिल्या 'विराट' शुभेच्छा; चाहत्यांनी पंतचा दाखला देत उडवली खिल्ली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. तर एकिकडे सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. टी-२० विश्वचषकात काल कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला. पाकिस्तानला पराभवाची धूळ चारल्यामुळे भारतात सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. भारताच्या विजयाचा हिरो किंग कोहलीने तमाम भारतीयांची दिवाळी गोड केली. विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी विराट कोहलीच्या या खेळीचे कौतुक केले आहे. अशातच बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने देखील कोहलीचे कौतुक करून भारतीयांना दिवाळीच्या 'विराट' शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या शुभेच्छांना चाहते काही भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. 

चाहत्यांनी पंतचा दाखला देत उडवली खिल्ली
खरं तर पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद ८२ धावांची शानदार खेळी केली. कोहलीच्या या खेळीमुळे भारताला विश्वचषकात विजयी सलामी देण्यात यश आले. उर्वशीने दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हटले, "तुम्हा सर्वांना दिवाळीच्या विराट शुभेच्छा #HappyDiwali2022", अशा आशयाचे ट्विट करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांना चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी उर्वशीला दिवाळीच्या रिषभ पंत शुभेच्छा दिल्या आहेत. 

उर्वशी-पंत ऑगस्टपासून नॉट आउट 
लक्षणीय बाब म्हणजे ऋषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांच्यातील वाद या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाला. उर्वशीने एका एंटरटेनमेंट पोर्टलला मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने मिस्टर आरपीचे नाव घेतले. उर्वशी म्हणाली होती की "मिस्टर आरपी" तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या लॉबीमध्ये जवळपास १० तास तिची वाट पाहत होता, परंतु त्या वेळी ती झोपली होती आणि त्यामुळे त्याला एवढी वेळ वाट पाहावी लागली होती. त्यामुळे ऑगस्टमध्ये सुरू झालेले हे प्रकरण आजतागायत सुरूच आहे. खरं तर उर्वशी अनेकवेळा क्रिकेटच्या मैदानावर दिसली आहे. अलीकडेच पार पडलेल्या आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला देखील तिने हजेरी लावली होती. 
 
किंग कोहलीची शानदार नाबाद खेळी
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची देखील सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाच्या अवघ्या ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. १८ चेंडूत विजयासाठी ४८ धावांची गरज असताना विराटने शानदार खेळी केली. अखेर हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

 

Web Title: After Urvashi Rautela give 'Virat' wishes on Diwali, fans mock her on Rishabh Pant   

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.