भारतीय संघाने ब्रिस्बेन कसोटीत कांगारुंना धक्का देत सामन्यासह कसोटी मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाला तब्बल ३२ वर्षांनंतर ब्रिस्बेनमध्ये कसोटी सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. भारताच्या या विजयानंतर ट्विटवर भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव तर सुरू झालाच पण यावेळी एक वेगळीच गोष्ट घडली.
ट्विटरवर चक्क भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचं नाव ट्रेंडमध्ये होतं. या मागचं कारण म्हणजे, ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाकडून युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आणि या खेळाडूंना घडविण्यात राहुल द्रविडचं खूप मोठं योगदान राहिलं आहे. त्यामुळे शार्दुल ठाकूर, शुबमन गिल, नवदीप सैनी, ऋषभ पंत यांसारख्या युवा खेळाडूंना घडविल्याबद्दल द्रविडचं सोशल मीडियात कौतुक सुरू झालं. राहुल द्रविड भारताच्या १९ वर्षाखालील खेळाडूंचा प्रशिक्षक आहे. नेमकं काय म्हणतायत ट्विटरकर पाहुयात...
गिल, शार्दुल, सैनी, पंत... थँक्यू गुरू द्रविड!
पाया मजबूत करण्यासाठी धन्यवाद द्रविड!
कला आणि कलाकारांसारखं आहे खेळाडू आणि द्रविडचं कनेक्शन
भारतीय संघाच्या यशामागे आहे द्रविडचं योगदान
द्रविडला नक्कीच वाटत असेल भारताच्या विजयाचा अभिमान
भारताचं भविष्य योग्य व्यक्तीच्या हातात...
म्हणून राहुल द्रविडला श्रेय जातं...
फॅन्सने केली द्रविडला प्रशिक्षक करण्याची मागणी