नागपूर : आगामी दक्षिण आफ्रिका दौ-याबाबत विचार मनात घोळत असले तरी सध्या तरी केवळ श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथे खेळल्या जाणा-या दुस-या कसोटी सामन्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे भारताचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने सांगितले. व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये शुक्रवारपासून खेळल्या जाणा-या या कसोटी सामन्यासाठी उभय संघांनी आज (बुधवारी) कसून सराव केला.या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना साहा म्हणाला, ‘मी सध्या खेळल्या जाणा-या लढतीच्या तयारीबाबत विचार करतो. दक्षिण आफ्रिका दौºयाबाबतचा विचार नक्कीच मनात घोळत असतात, पण कसोटीत विजय मिळवल्यानंतर मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळते. सध्या आम्ही त्याच प्रयत्नात आहोत.’ईडनवर पहिल्या कसोटी सामन्यात भारताला विजयासाठी केवळ तीन बळींची गरज होती. श्रीलंकेची ७ बाद ७६ अशी अवस्था असताना अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला आणि सामना अनिर्णीत संपला. अनिर्णीत निकालानंतर संघाचे मनोधैर्य कसे आहे, याबाबत बोलताना साहाने त्याचा सहकारी के. एल. राहुलच्या सुरात सूर मिसळला. राहुलप्रमाणे साहा म्हणाला, ‘आणखी काही षटके खेळ झाला असता तर भारतीय संघाने विजय मिळवला असता. पहिल्या डावात फलंदाजीमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी संघाच्या मनोधैर्यावर फरक पडलेला नाही. दुसºया डावातआम्ही दमदार पुनरागमन करताना धवन, राहुल व विराट यांनीचांगली फलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघाच्या सात फलंदाजांनाशंभरपेक्षा कमी धावसंख्येत बाद केल्यानंतर साहजिकच मनोधैर्य उंचावते. आणखी थोडा अधिक वेळ मिळाला असता तर विजयही मिळवता आला असता.’ (वृत्तसंस्था)>वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केल्यामुळे समतोल साधण्यास अडचण भासते का, याबाबत बोलताना साहा म्हणाला,‘मी नेहमीच सातव्या (किंवा आठव्या) स्थानावर फलंदाजी करतो, असे नाही. मी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. आम्हाला (आश्विन व जडेजा) रोटेट करण्यात येते. कारण फलंदाजीचा क्रम प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीच्या बाजूवर अवलंबून असतो. सलामीचे स्थान मुरली विजय, के. एल. राहुल व शिखर धवन यांच्यात असते. त्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी येतो. त्यानंतर पुढचे दोन स्थान विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांचे आहेत. दरम्यान, व्हीव्हीएस लक्ष्मणच्या निवृत्तीनंतर सहाव्या स्थानासाठी कुणी खेळाडू स्थायी स्वरुपात नाही. साहा स्वत: सहाव्या स्थानी खेळतो, पण कोलकातामध्ये भारताच्या दुसºया डावात तो आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्येसाहाने अनुक्रमे सातव्या व आठव्या क्रमांकावर फलंदाजी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ४० पेक्षा अधिक सरासरीने धावा फटकावल्या असूनत्याच्या नावावर तीन कसोटी शतकांची नोंद आहे. श्रीलंकेच्या दुसºया डावात सुरुवातीला काही निर्णय आमच्या बाजूने लागले असते तर निकाल नक्कीच वेगळा लागला असता, असे साहा म्हणाला.फलंदाजी क्रमामध्ये वारंवार बदल होत असला तरी त्याचा काही परिणाम होत नसल्याचे साहाने स्पष्ट केले. भारताच्या फलंदाजी क्रमामध्ये सहावेस्थान लवचिक आहे, असेहीत्याने सांगितले. साहा म्हणाला, ‘अनुकूल स्थिती स्थान निश्चित करते. मग ते सहावे, सातवे किंवा आठवे असो, संघव्यवस्थापनाच्या निर्णयानुसार ते यापैकी कुठलेही असू शकते.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- नागपूर कसोटीवर लक्ष, विजयानंतर मनोधैर्य उंचावण्यास मदत
नागपूर कसोटीवर लक्ष, विजयानंतर मनोधैर्य उंचावण्यास मदत
नागपूर : आगामी दक्षिण आफ्रिका दौ-याबाबत विचार मनात घोळत असले तरी सध्या तरी केवळ श्रीलंकेविरुद्ध नागपूर येथे खेळल्या जाणा-या दुस-या कसोटी सामन्यावर लक्ष केंद्रित केले असल्याचे भारताचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने सांगितले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 4:11 AM